
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करीत भारताने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. भारतीयांवर हल्ले केले तर आम्ही शांत बसणार नाही तर त्याचं योग्य त्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाईल. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी अनेक ठिकाणांची विमान उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान, जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाब या जिल्ह्यातील विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीर, अमृतसरसह देशातील 26 विमानतळं 10 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आा आहे. याशिवाय 430 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ज्या प्रवाशांचे यादरम्यान तिकीट बुकिंग होते, त्यांना रिफंड देण्यात येणार आहे. तर प्रवासी पुढील दिवसात बुकिंग करू शकतात अशी माहिती विमान कंपन्यांकडून देण्यात आली आहे.
नक्की वाचा - Operation Sindoor : मुंबईत हाय अलर्ट! बंदोबस्त वाढवला, पोलिसांचं 'ऑपरेशन ऑलआऊट'
कोणती विमानतळं बंद राहणार...
- श्रीनगर
- जम्मू
- लेह
- चंदीगढ
- अमृतसर
- लुधियाना
- पटियाला
- भटिंडा
- हलवारा
- पठाणकोट
- भुंतर
- शिमला
- गग्गल
- धर्मशाला
- किशनगढ
- जैसलमेर
- जोधपूर
- बिकानेर
- मुंद्रा
- जामनगर
- राजकोट
- पोरबंदर
- कांडला
- केशोद
- घोडन
- भुजवान
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world