जाहिरात

डोके कापले, शरीराचे 18 तुकडे केले; बिहारमधील त्या 4 हत्येचे कनेक्शन थेट महाराष्ट्रात! थरकाप उडवणारे सत्य समोर

Bihar Kaimur Murder Case: बिहारमधील 4 जणांच्या निर्घृण हत्या प्रकरणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधून दोघांना अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या या खळबळजनक हत्याकांडाचे संपूर्ण रहस्य.

डोके कापले, शरीराचे 18 तुकडे केले; बिहारमधील त्या 4 हत्येचे कनेक्शन थेट महाराष्ट्रात! थरकाप उडवणारे सत्य समोर
"Bihar Kaimur Murder Case: छोट्या भावाने मोठा भाऊ वहिनीसह दोन मुलांची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे-तुकडे"

Chhatrapati Sambhajinagar Arrest Bihar Murder: बिहारमधील चार जणांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (18 मे) दिली आहे. दीपक राजपूत (वय 27 वर्ष) आणि  गौतम गुप्ता (वय 22 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपीने दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा गळा चिरून हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून बॅगमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या चार जणांची इतक्या निर्घृणपणे हत्या का करण्यात आली? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

शिर नसलेल्या चार मृतदेहांचे थरकाप उडवणारे रहस्य

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चार शिर नसलेले मृतदेहांचे रहस्य अखेर उलगडले आहे. सुटकेस आणि पोत्यात मिळालेले मृतदेह एकाच कुटुंबातील चार जणांचे होते. एका मुलाच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या अंगणवाडीच्या ड्रेसवरील शिलाई टॅगच्या मदतीने पोलीस या हत्याकांडचा तपास लावण्यात यशस्वी ठरले आहेत. आई-वडील आणि त्यांच्या दोन मुलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन सख्खा भावांनी मिळून त्यांचा मोठा भाऊ, वहिनी आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या करून मृतदेहांचे तुकडे-तुकडे केले. डोके नसलेल्या मृतदेहाचे तुकडे बॅग आणि पोत्यात भरून दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.

आईला मारहाण, भावाकडे तक्रार अन् मित्राच्या मदतीने... | Mother Assaulted, Complaint to Brother, and Murder with Friend's Help...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेले सर्वजण रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डहरक गावचे रहिवासी होते. मृतदेहांची ओळख कृष्ण मुरारी, त्याची पत्नी आणि त्याची दोन मुले अशी करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडलीय. 5 मे रोजी कृष्ण मुरारीने आपल्या आईला मारहाण केली होती. ज्याबाबत त्याच्या आईने महाराष्ट्रात असलेला मुलगा विकास गुप्ताला माहिती दिली. यानंतर विकास मित्र दीपक कुमार राजपूतला घेऊन बिहारमध्ये पोहोचला. 7 मे रोजी विकास आणि त्याचा मित्र दीपक खोलीत बसले होते, तेव्हाच कृष्ण मुरारी तिथे आला. तिघं मिळून शेअर मार्केट विषयावर चर्चा करू लागले.

या दरम्यान तिघांमध्ये शा‍ब्दिक वाद झाले आणि विकास-दीपकने कृष्ण मुरारीवर चाकून सपासप वार केले. आरडाओरडा ऐकून जेव्हा कृष्ण मुरारीची पत्नी त्याला वाचवण्यासाठी धावली, तेव्हा आरोपींनी तिचीही हत्या केली. याच दरम्यान दोन्ही मुलांचीही हत्या करण्यात आली. यानंतर सर्वात लहान भाऊ राहुल उर्फ गौतम (जो दिव्यांग आहे) याने कुऱ्हाडीने मृतदेहांचे तुकडे-तुकडे केले.

आई आणि भावांच्या पत्नी पाहत राहिल्या संपूर्ण घटना | Mother and Brothers' Wives Watched the Entire Incident

या हत्याकांडात सर्वात हादरवणारी घटना म्हणजे जेव्हा या चौघांची हत्या करण्यात आली आणि मृतदेहांचे तुकडे केले गेले, तेव्हा मृत व्यक्तीची आई और त्याच्या दोन्ही लहान भावांच्या पत्नी घरात हजर होत्या आणि सर्व काही पाहत होत्या. यानंतर आरोपींनी चारही डोकी आणि शरीराचे तुकडे बॅग-पोत्यांमध्ये भरले, स्कुटीवरून दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. सुटकेसमध्ये भरलेले मृतदेहांचे तुकडे रामगढ-मोहनियां बॉर्डरवर दुर्गावती नदीत फेकले, तर पोत्यात ठेवलेले मृतदेहांचे तुकडे कालव्याजवळ फेकले. पुरावा नष्ट करण्यासाठी घरात पसरलेले रक्त धुवून टाकले आणि फरशीवर सिमेंटही लावलं.

(नक्की वाचा: Shirdi Crime: साईबाबांच्या शिर्डीत धक्कादायक कृत्य! UPमधून मुलांची तस्करी अन् नको ते काम; मोठ्या रॅकेटचा संशय?)

मृतदेहांचे तुकडे कसे सापडले? | How Were the Body Parts Found?

10 मे रोजी रामगढ-मोहनियां बॉर्डरवर दुर्गावती नदीतून 2 सुटकेस मिळाल्या होत्या, ज्यामध्ये शरीराचे 18 तुकडे होते. दोन दिवसांनंतर 12 मे रोजी अकोढी कालव्याजवळ एका पोत्यात डोके नसलेल्या धडासह  शरीराचे अन्य भागही पोलिसांनी ताब्यात घेतले. कैमूरचे पोलीस अधीक्षक हरी मोहन शुक्ला यांनी सांगितले की, मृतदेहाजवळ मिळालेल्या मुलांच्या ड्रेसवरून आणि मृतकाच्या शर्टवरून मृतदेहांची ओळख पटली. पोलिसांनी जेव्हा घराजवळील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि मोबाइल लोकेशनची तपासणी केली, तेव्हा समजले की घटनेच्या दिवशी मृत व्यक्तीच्या लहान भावाची तिथे ये-जा सुरू होती.

पोलिसांनी विकास गुप्ताला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्याने आपल्या मित्रासोबत आणि लहान भावासोबत मिळून हत्या केल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की तो मोठ्या भावाच्या वागणुकीला कंटाळला होता. हत्या करण्यात आलेल्या कृष्ण मुरारीला चार भाऊ होते. सर्वात मोठा कृष्ण मुरारी (मृतक), दुसरा सुभाष गुप्ता, तिसरा विकास गुप्ता (अटक केलेला आरोपी) आणि सर्वात लहान राहुल उर्फ गौतम. दुसरा भाऊ सुभाष हैदराबादच्या खासगी कंपनीत काम करतो, जो घटनेची माहिती मिळताच गावी पोहोचला आहे आणि त्यानेच अंत्यसंस्कार विधी पार पाडला.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com