Chhatrapati Sambhajinagar: ड्रग्स प्रकरणातील 'बबनभाईला' VIP वागणूक! पोलीस ठाण्यात जेवणाची खास व्यवस्था

गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून मिळालेली ‘व्हीआयपी’ वागणूक सध्या चांगलीच चर्चेत आली असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथून एमडी ड्रग्स तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वाहने जप्त करून दोन गोदामे सील केली असून तब्बल १ कोटी २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून मिळालेली ‘व्हीआयपी' वागणूक सध्या चांगलीच चर्चेत आली असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

'मी बापाचं ऐकत नाही, पण मित्रांचं ऐकतो, त्यांच्याशी शरीरसंबंध ठेव'; पत्र्याच्या शेडमध्ये तिघांकडून मुलीचं लैंगिक शोषण

समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या NDPS पथकाने वाळूज भागातील साजापूर टॅबलेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी संशयित रसायनांची पावडर जप्त केली होती. या प्रकरणात बबनभाई याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आले होते. याच बबनभाईला पोलीस ठाण्यामध्ये व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आले आहे.

24 जूनच्या रात्री बबनभाईला वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका हॉलमध्ये टेबलावर बसवून, फॅनच्या थंड हवेत, कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था केल्याचं या फोटो मधून दिसते आहे. गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी मुख्य आरोपीला इतकी सवलत दिली जात असल्याने कारवाईची पारदर्शकता आणि पोलिसांची निष्ठा याबाबत शंका उपस्थित होत आहे. राजकीय दबाव किंवा आर्थिक व्यवहार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Jalgaon Crime: वाळू माफियांची दादागिरी! महसूल विभागाच्या पथकाला अडवून मारहाण

दरम्यान,  ड्रग्स तयार करण्याकरिता रासायनिक पावडरची तस्करी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दोन आयशरमधुन 1 किलो 111 ग्राम आणि ४०१ ग्रॅम असा पावडरसदृश्य पांढरा रसायन जप्त केला. पोलिसांनी लॅबमध्ये याची चाचणी केली असता हे रसायन अमली पदार्थ असल्याबाबत समोर आले आहे. त्यामुळे मोठा ड्रग्ज रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Advertisement