जाहिरात

Jalgaon Crime: वाळू माफियांची दादागिरी! महसूल विभागाच्या पथकाला अडवून मारहाण

भडगाव तालुक्यातील घोडदे शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाळू माफियांकडून मारहाण करण्यात आली आहे. 

Jalgaon Crime: वाळू माफियांची दादागिरी! महसूल विभागाच्या पथकाला अडवून मारहाण

मंगेश जोशी, जळगाव: राज्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा हैदोस पाहायला मिळत आहे. अनेकदा या वाळू माफियांची सरकारी अधिकाऱ्यांवरही दादागिरी पाहायला मिळते. असाच धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यातील घोडदे शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाळू माफियांकडून मारहाण करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातल्या घोडदे शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाळू माफियांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  महसूल विभागाच्या पथकाने जप्त केलेले वाळूचे दोन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणताना दहा ते बारा वाळू माफियांनी महसूल विभागाच्या पथकाला अडवले.

यावेळी वाळू माफियांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये 12 वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाच पोलिसांनी अटक केली असून फरार वाळू माफी यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. कारवाईसाठी आलेल्या महसूलच्या कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांनी हात उचलल्याने कायद्याचा धाक आहे की नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Love affair news: Facebook वर प्रेम जडलं, 12 वीच्या मुलासाठी नवऱ्याला सोडलं, प्रकरणाला असं वळण मिळालं की...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com