जाहिरात
This Article is From May 24, 2024

दोन सख्ख्या भावांची लगीनघाई; बापाचा नकार.. शेवटी निर्घृण हत्या!

वडगाव कोल्हाटी येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत 48 वर्षीय छत्रपती संभाजीनगर यांचा मृत्यू झाला आहे. 

दोन सख्ख्या भावांची लगीनघाई; बापाचा नकार.. शेवटी निर्घृण हत्या!
छत्रपती संभाजीनगर:

लग्न हा आनंदाचा क्षण असतो. कुटुंबाला जोडणाऱ्या या लग्नामुळे एका बापाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला आहे. वडगाव कोल्हाटी येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत 48 वर्षीय संपत लक्ष्मण वाहुळ यांचा मृत्यू झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत वाहुळ यांना दोन मुलं आहे. एक पोपट वाहुळ (28) आणि दुसरा प्रकाश वाहुळ (26). या दोघांनाही लग्न करण्याची इच्छा होती. यासाठी ते वारंवार वडिलांच्या मागे लागले होते. मात्र वडिलांकडून यासाठी नकार दिला जात होता. 8 मे रोजी सायंकाळी याच कारणावरुन दोन्ही मुलं आणि बापामध्ये वाद झाला. या वादानंतर लहान मुलगा प्रकाशने वडिलांना बुटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोठा मुलगा प्रकाशने जवळील सुरा काढत वडिलांवर सपासप वार केले.

नक्की वाचा - संतापजनक : 'माझ्यासोबत चल...', मित्रानं केला विवाहित महिलेसोबत भयंकर प्रकार

यावेळी वडील स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र बाहेर येऊही दोन्ही मुलांनी त्यांच्यावर सुऱ्याने वार केले. आरडाओरडा केल्यानंतर संपत वाळूज यांचे नातेवाईक बाहेर आले आणि त्यांनी संपत यांची सुटका केली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र 23 मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  याप्रकरणी दोन्ही मुलांवर खुनाचा गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com