जाहिरात

Shocking News: क्रुर घटनेने महाराष्ट्र हादरला! घरामध्ये लिंगनिदान, सासरच्यांनी विवाहितेला दिल्या नरकयातना

तोतया डॉक्टरच्या टोळीने तीचं पोट दाबून बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी  जालन्याहून चक्क 'तोतया' डॉक्टरांची टोळी बोलावण्यात आली.

Shocking News: क्रुर घटनेने महाराष्ट्र हादरला! घरामध्ये लिंगनिदान, सासरच्यांनी विवाहितेला दिल्या नरकयातना

Chhatrapati Sambhajinagar Crime:  तिसरीही मुलगी नको म्हणून ५ महिन्यांच्या गर्भवतीचे घरामध्येच लिंगनिदान करुन गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे.  केवळ 'मुलगी' होणार आहे म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेसोबत अमानुष कृत्य केले. विवाहितेचा पती, सासू, सासऱ्याने गोळ्या देऊन आणि चक्क पोट दाबून तिचा गर्भपात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पती, सासू-सासरे, गर्भपात टोळीतील कमल तिनगोसह तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागात एका 5 महिन्यांच्या गर्भवतीला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्या. त्यानंतर बाहेरुन बोलावलेल्या तोतया डॉक्टरच्या टोळीने तीचं पोट दाबून बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी  जालन्याहून चक्क 'तोतया' डॉक्टरांची टोळी बोलावण्यात आली.

२७ फेब्रुवारी रोजी आरोपी पती अरबाज सय्यद याने दोन अनोळखी पुरुष आणि एका महिलेला पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह घरात आणले. 'मुलगा आहे की मुलगी हे डॉक्टर सांगतील' असं म्हणत बळजबरीने लिंगनिदान चाचणी करण्यात आली. जेव्हा स्पष्ट झालं की गर्भात मुलगी आहे, तेव्हापासून या महिलेचा नरकयातनांचा प्रवास सुरू झाला.

Pune Crime: मांजर, पोपट, पिंजरा.. दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी, पुण्यातील धक्कादायक घटना

घरातच गर्भपात, आधी गोळ्या, नंतर भयंकर कृत्य

त्यानंतर  6 मार्च रोजी या सर्वांनी कौर्याचा कळस गाठला. सासरच्या मंडळींनी जालन्यातील कमल तीनगोटे नावाच्या एका महिलेसह तिच्या तीन साथीदारांना घरी बोलावले. या सर्वांनी पीडित महिलेला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खायला लावल्या. त्यानंतर तिला खाली झोपवून पोटातला गर्भ मारण्यासाठी तिचे पोट जोरात दाबण्यात आले. या अमानुष वेदनेने विवाहिता ओरडत होती,मात्र क्रुर लोकांना तिची दया आली नाही. शेवटी याबाबत पिडीतेने तिच्या वडिलांना माहिती दिली आणि हा प्रकार समोर आला. 

मुलीच्या वडिलांनी डॉक्टरांसह रात्री साडेआठच्या सुमारास घरावर धाड टाकली. पोलीस आल्याचे समजताच  डॉक्टर आणि टोळीतील महिला मागच्या दाराने पसार झाले. पोलिसांनी तातडीने पीडितेची सुटका करून तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात पती अरबाज, सासू आशिया आणि सासरे फेरोज सय्यद यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: जुन्नर हादरले! लग्नास नकार, तरुणीवर कोयत्याने सपासप वार; त्यानंतर तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com