वादात अडकलेल्या IAS पूजा खेडकरांची पहिली प्रतिक्रिया, आजपासून वाशिम कार्यालयात रुजू!

ऑडी कारवर लाल रंगाचा दिवा, स्वतंत्र केबिनची मागणी, वडिलांची संपत्ती 40 कोटी आणि पूजा खेडकर यांनी UPSC मध्ये नॉन क्रिमिलेयरअंतर्गत नोंदणी केली या कारणांमुळे पूजा खेडकर यांच्यावर टीका केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाशिम:

वादग्रस्त परिविक्षाधीन IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाशिम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नुकतीच बदली करण्यात आली आहे. आज दोन दिवसांनी वाशिम जिल्हाधिकारी (Controversial probationary IAS officer Puja Khedkar) कार्यालयात त्या दाखल झाल्या असून वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. याच्या सोबत त्याची चर्चा सुरू असून आता त्याच्याकडे काय जबाबदारी मिळणार हे बघावं लागणार आहे. आजपासून त्या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या आहेत. 

यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पूजा म्हणाल्या की, आजपासून ंमी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले आहे. मात्र सरकारी बाबी असल्याकारणाने मी आता काहीच कमेंट करू शकत नाही. एकंदर त्यांनी या प्रकरणात बोलणं टाळल्याचं दिसून येत आहे. 

Advertisement

Advertisement

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी पुण्यात स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली होती. याशिवाय त्यांनी ऑडी कारवर लाल रंगाचा दिवा लावल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. पुण्यात त्यांनी स्वतंत्र केबिनची मागणी केली होती, मात्र वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना स्वतंत्र केबिन मिळण्याची शक्यता कमीच आहे. वाशिमच्या जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचे सध्या नूतनीकरण सुरू आहे. तर जिल्ह्यात निवासस्थानाची कमतरता असल्यानं विश्राम गृहात मुक्काम करावा लागतोय. 

Advertisement

नक्की वाचा - वडिलांची संपत्ती 40 कोटी, लेकीला नॉन क्रिमिलेयरमधून IAS पद; पूजा खेडकरांना कोणाचा राजकीय वरदहस्त?

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस पदावर रुजू होणाऱ्या पूजा दिलीप खेडकर (IAS Puja Dilip Khedkar) यांनी UPSCच्या 2022 च्या परीक्षेत देशात 821 ऑल इंडिया रँक मिळवला. या रँकवर आयएएस पद मिळणे अवघड असतानाही पुजाने ते प्राप्त करण्यासाठी ओबीसी नॉन क्रीमिलेअर असल्याचे प्रमाणपत्र देऊन दृष्टिदोष आणि मानसिक आजार असल्याचे सांगतील होते. त्यावर आयएएस पदावर वर्णी लावली आहे. पण वंचित बहुजन पक्षाकडून तिच्या माजी आयएएस अधिकारी राहिलेल्या वडिलांनी नुकतीच लोकसभा निवडणूक दक्षिण अहमदनगरमधून लढवली आहे. त्यात निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची असल्याचे आणि शेतीतून 43 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पूजा (IAS Puja Khedkar) यांनी सादर केलेल्या नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहेत.