CBI Raids in Mumbai and Nashik : परदेशात नोकरी, पर्यटन किंवा अन्य कोणत्याही कामासाठी जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. पासपोर्ट केंद्रातील रांगा कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षात ही सुविधा सुटसुटीत झाली आहे. त्याचा फायदा पासपोर्टधारकांची संख्या वाढण्यात झाली आहे. या सर्व पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा सीबीआयनं केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सीबीआयकडून मुंबई आणि नाशिक परिसरात एकूण 33 ठिकाणी धाडी टाण्यात आल्या आहेत. मुंबईतल्या परेल, मालाड परिसरात सीबीआयनं ही कारवाई केली आहे. या प्रकरणात पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
( नक्की वाचा : पोलीस भरतीला गालबोट, 23 वर्षांच्या तरुणाचा मैदानातच मृत्यू )
बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट देण्यात आल्याचा सीबीआयनं दावा केलाय. काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंट मध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हंटलं आहे.मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केले आहेत. त्यामधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.