Crime News : 20 रुपये घेऊन खाऊ आणायला घराबाहेर गेली अन् आढळला मृतदेह; 1 वर्षांपूर्वीच कनेक्शन उघड

या मुलीचा मृतदेह बापगाव येथील कब्रस्तान नजीकच्या निर्जनस्थळी आढळून आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भुपेंद्र आंबवणे, प्रतिनिधी

भिवंडी कल्याण सीमेवरील गांधारी पुलानजीकच्या बापगाव गावातील कब्रस्तान परिसरातील निर्जनस्थळी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एक 13 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजेपासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारी वरून पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली होती. 

नक्की वाचा - Crime News: आधी 15 लाख मागितले, मग बॉस सोबत शरीरसंबध ठेवायला सांगितले, पुढे मात्र...

या अपहरण झालेल्या मुलीचा शोध स्थानिक कल्याण पोलीस घेत असतानाच मंगळवारी सकाळी या मुलीचा मृतदेह बापगाव येथील कब्रस्तान नजीकच्या निर्जनस्थळी आढळून आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तिची निर्घृण हत्या करण्यात आली असून तिच्यावर अत्याचारसुध्दा केल्याची माहिती मिळत आहे. कल्याण आणि परिसरात मागील काही दिवसात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असताना ही दुर्दैवी घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Cyber crime: 'हॅलो मी कस्टममधून बोलतोय', एक फोन अन् डॉक्टर महिलेच्या खात्यातून 16 लाख फुर्रर्रर्र

सायंकाळी 4 वाजता मुलगी आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी गेली होती. ती रात्री उशीरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत मुलीच्या अपहरणाची माहिती दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे याच मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एक वर्षांपूर्वी 32 वर्षीय तरुणाविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीकडून मुलीच्या कुटुंबीयांना धमकी दिली होती. त्यामुळे त्याचं आरोपीने हा गुन्हा केल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. आरोपीला पोलिसांनी पकडून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी केली आहे.

Topics mentioned in this article