अमजद खान
लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना या थांबण्याचे नाव घेत नाही. बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर आरोपीचा एन्काऊंटर झाला. त्यानंतर तरी अशा घटना होणार नाहीत अशी अपेक्षा होता. पण त्या घटना कमी होण्या ऐवजी वाढत चालल्याचं समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता डोंबिवलीत घडली आहे. इथं एका 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत. पिडीत मुलगी ही शिवकणीसाठी गेली असता हा प्रकार घडला. ज्या वेळी ती घरी गेली त्यावेळी झालेला संपुर्ण प्रकार तिने आपल्या पालकांना सांगितला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडित मुलीचा कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे. त्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच आला. आरोपीला पोलिसांनी बेड्या ही ठोकल्या आहेत. वैभव जितेंद्र सिंग असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो 19 वर्षाचा आहे. तो ही डोंबिवलीत राहातो. यांच्यात घरी ही मुलगी शिकवणीसाठी नियमित जाते. त्याच वेळी त्याने हे कृत्य केले.
डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहत आहे. आरोपी वैभव सिंग याची बहीण ट्युशन टीचर आहे. परिसरातील मुलं त्याच्या घरी ट्युशन घेण्यासाठी येतात. 15 जानेवारीला रात्री आठ वाजता पिडीत मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनसाठी गेली होती. त्यावेळी घरात ट्युशन टीचर नव्हती. हीच संधी साधत आरोपी वैभवने हे घाणेरडे कृत्य केले. शिवाय कुणाला काही सांगितलं तर मारून टाकेन अशी धमकी दिली.
ही धमकी दिल्यानंतर आरोपी वैभव याने पिडीत मुलीचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेवून गेला. बेडरूमच्या दरवाजाची कडी आतुन लावून पिडीत मुलीसोबत जबरदस्तीने बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली. घडलेल्या घटने बद्दल कुटुंबीयांना सांगितलं. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोड आरोपीला अटक करून तपास सुरु केला आहे.