जाहिरात

Saif Ali Khan Net Worth : सैफला उगाच म्हणत नाहीत छोटे नवाब! संपत्ती समजल्यावर पडाल चाट

Saif Ali Khan News : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात हल्ला (Saif Ali Khan Attacked) झाला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झालाय.

Saif Ali Khan Net Worth : सैफला उगाच म्हणत नाहीत छोटे नवाब! संपत्ती समजल्यावर पडाल चाट
Saif Ali Khan Property
मुंबई:

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात हल्ला (Saif Ali Khan Attacked) झाला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झालाय. त्याच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हल्लेखोर चोरीच्या हेतूनं त्याच्या घरात शिरला होता, अशी माहिती आहे. या घटनेनं फिल्म इंडस्ट्री आणि फॅन्समध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर सैफ अली खान चर्चेत आहे. अभिनेत्याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सैफची छोटे नवाब अशीही ओळख आहे. त्याची एकूण संपत्ती किती आहे, पाहूया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सैफ अली खानची संपत्ती

मीडिया रिपोर्टनुसार सैफ अली खानची एकूण संपत्ती जवळपास 1200 कोटी आहे. तो प्रत्येक सिनेमासाठी जवळपास 10-15 कोटी रुपये मानधन घेतो. तसंच ब्रँडच्या प्रमोशनमधून 1.5 कोटी रुपये कमावतो. सैफचे वांद्रेमध्ये दोन अपार्टमेंट आहेत. वांद्रेमधील या अपार्टमेंटमध्ये त्याच्यावर चोरानं धारधार चाकूनं हल्ला केला.

सैफचे हे अपार्टमेंट चार मजली आहे. त्यामधील प्रत्येक मजल्यावर सुसज्ज हॉल आणि तीन बेडरुम आहे. वांद्रेमध्येच सैफचे आणखी एक अपार्टमेंट आहे. त्याचे नाव फॉर्च्यून हाईट्स आहे. करीनाशी लग्न झाल्यानंतर सैफ याच अपार्टमेंटमध्ये राहत होता. 11 वर्ष या अपार्टमेंटमध्ये राहिल्यानंतर सैफ आणि करीना सतगुरु शरण अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला आहे. या अपार्टमेंची किंमत 103 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. तर त्याच्या फॉर्च्यून हाईट्सची किंमत 50 कोटींच्या आसपास आहे. त्यांनी हे अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. 

( नक्की वाचा : Saif Ali Khan Attack : इमारतीच्या पाईपवरुन चढला, तैमूरच्या खोलीत शिरला अन्...; सैफ प्रकरणाला वेगळं वळण )

स्वित्झर्लंडमध्ये घर

सैफ आणि करीना यांचं स्वित्झर्लंडमधील गस्तादमध्ये लग्झरी घर आहे. त्याची किंमत 33 कोटी असल्याचं सांगितलं जातं. सैफनं 2018 साली कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता. त्यामधूनही त्याला कोट्यावधींची कमाई होते. तो टायगर्स ऑफ कोलकाता टीमचा मालक आहे. ही इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील टीम आहे. या माध्यमातूनही त्याची चांगली कमाई होती. 

लग्झरी कार

सैफ अली खानकडं अनेक लग्झरी कार आहेत. त्यामध्ये मर्सिडिज बेंज एस क्लास 350 डी, लँड रोव्हर डिफेंडर 110  आणि ऑडी क्यू7 यांचा समावेश आहे. 

(नक्की वाचा : Virat Kohli Home : विराट आणि अनुष्का झाले अलिबागकर, कसं आहे 32 कोटींचं घर ? पाहा Video )

पतौडी पॅलेस

सैफच्या संपत्तीचा मोठा हिस्सा त्याच्या वंशपरंपरागत पतौडी पॅलेस आहे. हा हरियाणामध्ये आहे. त्याची किंमत जवळपास 800 कोटी आहे. या विशाल संपत्तीला इब्राहिम कोठी असं म्हंटलं जातं. 10 एकर पेक्षा जास्त भागात ही संपत्ती पसरली आहे. 

आठवे पतौडी नवाब, इफ्तिखार अली खान यांनी 1900 च्या दशकात सुरुवातीला या महलाची निर्मिती केली. दिल्लीतील इंपिरियल हॉटेलपासून प्रेरित आहे. त्यामध्ये शाही वारसा आणि वास्तूकलेचा मिलाफ आहे. 

पतौडी पॅलेसमध्ये काय आहे?

या महालात भव्य बेडरुम आहे. त्याला खास डिझाईन, आरामदायक फायरप्लेस आणि सुंदर बाल्कनी आहे. डायनिंग हॉलला मोठी खिडकी आणि 22 सीटचे टेबल आणि सुंदर झूमर आहे. मनोरंजनासाठी 7 खोल्या आहेत. त्यामध्ये एक बिलियर्ड्स रुम आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदान आणि एक ग्रंथालय देखील या पॅलेसमध्ये आहे.

अनेक चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी देखील पतौडी पॅलेसचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये  वीर-जारा (2004), मंगल पांडे (2005), ईट प्रे लव (2010) और तांडव (2019) या प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com