अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे पश्चिम येथील त्याच्या राहत्या घरात साधारण मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने जबर हल्ला (Actor Saif Ali Khan Attack) केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान जबर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती त्याच्या घरात शिरली (Actor Saif Ali Khan New Home ) होती. यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादात चोराने सैफ अली खानवर सहा वेळा वार केले. त्यापैकी दोन खोलवर होते. या हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेला, डाव्या मनगटाला आणि छातीला दुखापत झाली आहे. चाकूचा एक छोटासा भाग अभिनेत्याच्या मणक्यालाही लागला आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
का केला हल्ला?
मध्यरात्री तीनच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती इमारतीच्या पाईपवरुन बेडरूममध्ये घुसली, अशी माहिती समोर आली आहे. तर काहींनुसार, ही व्यक्ती आधीच घरात दबा धरून बसली होती. ही व्यक्ती बेडरूममध्ये शिरली. ही बेडरूम तैमूरची असल्याची माहिती आहे. या खोलीत अज्ञात व्यक्तीचा मोलकरणीसोबत वाद झाला. दोघांमधील वादाचा आवाज ऐकून अभिनेता सैफ अली खान तिथे आला. काही कळायच्या आत त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफच्या घरात काम करणारी अरियामा फिलिप उर्फ लिमा ही महिला कर्मचारी जखमी झाली आहे. तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहे. सैफच्या घरात काम करणारी महिला कर्मचारी आणि अज्ञात व्यक्ती एकमेकांना ओळख होते आणि त्यांच्यातील वादातून हा प्रकार घडला.
नक्की वाचा - Saif Ali Khan Attack : शरीरावर 6 जखमा, मणक्याला जबर मार; मध्यरात्री 2 वा. करिना-सैफच्या घरात नेमकं काय घडलं?
दोन तासांपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज समोर..
मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दोन तास आधीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घरात कोणीही येताना दिसलं नाही. हल्लेखोर आधीच इमारतीत आणि घरात घुसल्याचा पोलिसांना संशय आहे. अधिक माहितीसाठी सीसीटीव्हीची तपासणी सुरू आहे.
दरम्यान एक व्हिडिओ समोर आला असून वायरल भवानीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ हल्ल्यानंतरचा असल्याचं सांगितलं जात आहे.
दया नायक घटनास्थळी...
दरम्यान या घटनेचा तपास सुरू (Daya Nayak) असून एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक सैफ अली खानच्या घरी दाखल झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास दया नायक यांच्या हाती सोपवण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world