जाहिरात

Crime news: 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, 6 जणांनी आधी झाडीत नेलं नंतर...

भिवंडीच्या प्रथम तालुका पोलीस ठाण्यात तिने धाव घेतली. तिथे तिने 6 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Crime news: 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, 6 जणांनी आधी झाडीत नेलं नंतर...
भिवंडी:

एक 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना भिवंडीत घडली आहे. 6 नराधमांनी या तरुणीचे तिच्या भावासह अपहरण केले. त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केली. यावेळी तिच्या भावाला या नराधमांनी मारहाण केली. आधी अत्याचार केल्यानंतर या लोकांनी परत या तरुणीवर एका बोलेरो गाडीत ही अत्याचार केले.त्यानंतर सर्व आरोपी हे फरार झाले आहेत. शहरात झालेल्या या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पीडित तरुणी ही भावासह रिक्षाने चालली होती. त्याच वेळी  बागे फिरदोस परिसरात त्यांची रिक्षा आली. त्यावेळी तिथे हे सहा नराधम होते. त्यांनी त्या तरुणीचे तिच्या भावासह अपहरण केले. तिथून त्या तरुणीला नागाव इथल्या परिसरात नेण्यात आले. इथं मोठ्या प्रमाणात झाडी आहे. सहा जणांनी त्या मुलीला झाडीमध्ये नेले. त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले. यावेळी काही जण तिच्या भावाला मारहाण करत होते. 

ट्रेंडिंग बातमी - Ganoji Shirke: छत्रपती संभाजी राजेंबरोबर गणोजी शिर्केंनी खरोखर गद्दारी केली होती का? पुरावे काय सांगतात?

अत्याचार केल्यानंतर या सर्वांनी त्यांना फातिमा नगर परिसरात आणले. तिथे ही त्यांनी एका पिकप बोलेरो गाडीत त्या मुलीला टाकले. शिवाय तिथेच तिच्यावर परत अत्याचार केले. त्यानंतर या सहा ही जणांनी तिथून पळ काढला. झालेल्या घटनेमुळे ती तरुणी हादरून गेली होती. तर तिचा भाऊ ही मारहाणी मुळे जखमी झाला होता. सामूहिक बलात्काराने ती तरुणी तर हादरून गेली होती. तिने तिथून पोलिस स्थानकात जाण्याचा निर्णय घेतला.  

ट्रेंडिंग बातमी - Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा

भिवंडीच्या प्रथम तालुका पोलीस ठाण्यात तिने धाव घेतली. तिथे तिने  6 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्ह्या ही नोंदवला गेला आहे. पुढे हा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. शांतीनगर पोलीस या बाबत आता तपास करत आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पण त्यातील पाच जण हे अजून ही फरार आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.