जाहिरात

Ganoji Shirke: छत्रपती संभाजी राजेंबरोबर गणोजी शिर्केंनी खरोखर गद्दारी केली होती का? पुरावे काय सांगतात?

शिवाजी महाराजांचे निधन झालं. त्यावेळी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे हे प्रमुख प्रधान संभाजी राजेंच्या विरोधात होते.

Ganoji Shirke: छत्रपती संभाजी राजेंबरोबर गणोजी शिर्केंनी खरोखर गद्दारी केली होती का? पुरावे काय सांगतात?
मुंबई:

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंचा घात गणोजी राजे शिर्के आणि त्यांच्या भावाने खरोखरच केला का असा प्रश्न निर्माण झाला आहे. चित्रपटात शिर्के बंधूमुळे संभाजीराजे औरंगजेबाच्या तावडीत सापडले असे दाखवले आहे. पण इतिहासात त्याबाबत काय पुरावे आहेत? खरोखरच शिर्के बंधूमुळे छत्रपती संभाजी राजेंचा घात झाला होता का? याबाबत आता अनेक गोष्टी समोर येत आहेत. शिर्केंचे वंशजही याबाबत आता पुढे आले आहेत. तर इतिहास अभ्यासकांनीही आपली मतं याबाबत नोंदवली आहे. ही मतं नोंदवताना त्यांनी इतिहासातील पुराव्यांचे दाखले दिले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छत्रपती संभाजी राजे हे गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते. ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे भाऊ होते. छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या  राजकुंवरबाईसाहेबांचे गणोजी हे पती होते. भोसले आणि शिर्के कुटुंबात साटंलोट करण्यात आलं होतं. अशा या शिर्के कुटुंबावर गद्दारीचा  शिक्का मारण्यात आला आहे. पण इतिहास नक्की काय सांगतो. खरोखर गणोजी शिर्केंनी गद्दारी केली होती का याबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी काही गोष्टी समोर ठेवल्या आहेत. त्यांनी सर्वात आधी भोसले आणि शिर्के कुटुंबाचं नातं कसं होतं यावर प्रकाश टाकला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते दक्षिण दिग्विजयासाठी निघाले होते. त्यावेळी संभाजी महाराजांना रायगडावर ठेवणं सुरक्षित नाही हे त्यांना समजलं होतं. प्रधानमंडळातील अण्णाजी दत्तो आणि संभाजी महाराजांचे मतभेद होते. त्यामुळे त्यांना धोका होवू शकतो असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होतं.  असं इतिहास अभ्यासक सांगतात.  त्यामुळे दक्षिणेकडे जाण्या आधी महाराजांनी संभाजी राजेंना श्रुंगारपूरला त्यांना ठेवलं होतं. ही संभाजी राजेंची सासूरवाडी होती. त्यांना सासूरवाडीत शिर्केंच्या घरी ठेवण्यात आले होते. येवढं विश्वासाचं नातं भोसले आणि शिर्के कुटुंबात होतं असं इंद्रजीत सावंत सांगतात.          

ट्रेंडिंग बातमी - Chhaava Movie: लाडक्या बहिणींसाठी 'छावा' चित्रपट मोफत! कधी अन् कुठे? जाणून घ्या...

पुढे शिवाजी महाराजांचे निधन झालं. त्यावेळी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे हे प्रमुख प्रधान संभाजी राजेंच्या विरोधात होते. त्यांच्या विरुद्ध कटही रचला गेला होता. मात्र तो अयशस्वी ठरल्याचं इतिहास अभ्यासकांनी सांगितलं.  त्यानंतर संभाजी राजे स्वत: रायगडावर गेले नाहीत. त्यांनी त्या आधी शिर्केंना म्हणजेच पिलाजीराव शिर्के यांना रायगडावर पाठवले होते. असं ही सावंत यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे. त्यामुळे त्यांचे हे नातं खुप वेगळं होतं. एक विश्वासाचं नातं होतं. इतिहासही तसाच सांगतो, असं ही त्यांनी स्पष्ट केलं. पण इतिहासात पुढे काय झालं? त्यात काय नोंदी आहेत याची चर्चा आता होत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Chhaava Video: 'छावा' पाहताना चवताळला, तरुणाने असं केलं की थेट जेलमध्ये गेला... पाहा VIDEO

 मात्र छावा चित्रपटात गणोजी शिर्कें आणि त्यांच्या भावाला खलनायक दाखवलं गेलं आहे. शिर्केंमधील सगळीच मंडळी ही औरंगजेबाला मिळाली नव्हती. अनेक शिर्के हे स्वराज्यात होती. ते संभाजी राजेंच्या मागे होते. 1688 त्या जेधे शकावलीमध्ये त्याचा एक उल्लेख आहे. कवी कलश यांच्यावर रुसून शिर्के पारके झाले असं त्यात म्हटलं आहे. ज्यावेळी कवी कलश आणि शिर्के यांच्यात वाद झाला त्यावेळी मध्यस्ती ही संभाजी राजे यांनी केली होती. पण पुढे कवी कलशावर शिर्केंनी हल्ला केला. त्यावेळी मात्र संभाजी राजे कवी कलशाच्या बाजूने उभे राहीले. त्या लढाईत शिर्केंचा पराभव झाला. हा इतिहास आहे असं ही सावंत यांनी सांगितलं.    

ट्रेंडिंग बातमी - Chhaava Movie : 'छावा' पाहून लहानग्याला अश्रू अनावर; VIDEO पाहून तुमचाही ऊर भरुन येईल

शेख निजाम मुकर्रब खानाने संभाजी महाराजांना संगमेश्वर इथं पकडले. त्यावेळी गणोजी शिर्के आणि त्यांचा भाऊ कान्होजी शिर्के मुकर्रब खाना बरोबर होते असं चित्रपटात दाखवण्यात आले आहे. शिवाय कोल्हापूर ते संगमेश्वर हा रस्ता ही त्यांनी दाखवला. त्यावेळी त्यांनीच लिड केलं असंही दाखवलं गेलं आहे. पुढे संगमेश्वर इथं छापा टाकला जातो. त्याच वेळी संभाजी राजेंना कसं पकडायचं हे ही शिर्के बंधू सांगतात असं चित्रपटात आहे. पण वास्तविक याचा कोणताही एक ओळीचा पुरावा उपलब्ध नाही असा दावा  इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. त्यामुळे चित्रपटात दाखवलेल्या गोष्टीं बरोबर त्यांनी असहमती ही दर्शवली आहे. तसा जर कोणता पुरावा असेल तर तो दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. जे काही दाखवलं गेलं आहे त्याला कोणताही इतिहासाचा आधार नाही असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Chhaava Box Office : 'छावा' पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी; दुसऱ्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई

छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेळी कैद केली गेली त्यावेळची कागदपत्र काय सांगतात, त्या वेळचे पुरावे काय सांगतात हे महत्वाचे असल्याचे सावंत सांगतात. त्या वेळचा एक महत्वाचा पुरावा सर्वां समोर आहे. तो म्हणजे फ्रान्सिस मार्टीन याची डायरी. हा फ्रान्सिस फ्रेंचांचा गव्हर्नर होता. त्यावेळी संगमेश्वर जवळ राजापूरला फ्रेंचांची वसाहत होती. त्यामुळे स्वराज्यात काय चाललं आहे हे त्याला राजापूरातून समजत होतं. संभाजी महाराजांना फेब्रुवारी महिन्यात पकडलं गेलं होतं. त्यांनी मार्चमध्येच याबाबत आपल्या डायरीत लिहीलं होतं. संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राम्हण सहकारकूनांनी पकडून दिलं. त्याच ब्राम्हण सरकारकूनानी मोघलांशी आधीच संधान बांधलं होतं. असा उल्लेख त्या डायरीत असल्याचं सावंत सांगतात. 

ट्रेंडिंग बातमी - Chhaava Movie: एक वाक्य अन् अख्खं थिएटर सुन्न! 'छावा'मधील 'हा' डायलॉग आणेल डोळ्यात पाणी

शिवाय संभाजी महाराजांना मारण्याचा कट ही रचला गेला होता. मात्र ते ब्राम्हण सरकारकून कोण होते यांची नावं त्यात लिहीलेली नाहीत. मात्र त्याकाळात ते सरकारकून कोण होते हे उपलब्ध आहे. असं ही सावंत यांनी सांगितलं.  ज्या ठिकाणी संभाजी राजेंना पकडले गेले ते संगमेश्वर हे ठिकाण आहे. त्या संगमेश्वरचं देशकुलकर्णी पद हे अण्णाजी दत्तोकडे होतं. शिवाय संगमेश्वरचं कुलकर्णीपद ही त्याच्याकडेच होते. अण्णाला हत्तीच्या पायी दिलं होतं. त्याच्या बरोबरचे सर्वच जण सापडले नव्हते. हा एक अँगल तपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिवाय छापा टाकला तो मुकर्रब  खान हा वसमत मधला होता. वसमतचं कुलकर्णीपद सुद्ध अण्णाजी दत्तोजीच्या बापाकडे होतं. या सर्व तारा जोडल्यातर संभाजी महाराजांच्या हत्ये मागे कोण होतं याचा छडा लागू शकतो. त्यामुळे इतिहासाचा नव्याने अभ्यास करावा लागेल असंही सांवत म्हणाले. एका वृत्तवाहीनीला  दिलेल्या मुलाखतीत सावंत यांनी याबाबींचा उल्लेख केला आहे.