सुनील कांबळे, लातूर
लातूर पोलिसांकडून पुन्हा एकदा एमआयडीसी परिसरात गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत 44 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मागील आठवड्यात अतिरिक्त एमआयडीसी परिसरात अशीच कारवाई करण्यात आली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लातूर अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील राहुल कोल्ड्रिंक्स, प्लॉट नंबर 148 या गोडाऊन वर छापा टाकण्यात आला. यावेळी शासन प्रतिबंधित गुटखा व गुटखा तयार करण्याचे साहित्य असे 44 लाख 22 हजार 678 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
(वाचा - पुरेपूर कोल्हापूर! पैज जिंकली अन् मिळवल्या 8 बोकडाच्या मुंड्या, 32 पाय, रोख रक्कम)
या प्रकरणी पोलिसांनी विजय केंद्रे, जयपाल जाधव, बाळासाहेब वाघमारे, मल्हारी मजगे आणि अर्जुन केदार यांचे विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल केला आहे.
(नक्की वाचा - कल्याणमध्ये प्रवचनकार महाराजाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल)
मागील आठवड्यात करण्यात आलेल्या कारवाईत लातूर पोलिसांनी गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा व गुटखा बनवण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.