जाहिरात
This Article is From Jun 07, 2024

कल्याणमध्ये प्रवचनकार महाराजाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

Kalyan Crime News : निलेश महाजन असे या प्रवचनकाराचे नाव असून खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.

कल्याणमध्ये प्रवचनकार महाराजाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

कल्याणमध्ये एका प्रवचनकारावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेच्या आरोपानंतर पोलिसांना ही कारवाई केली आहे. निलेश महाजन असे या प्रवचनकाराचे नाव असून खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवचनकार निलेश महाराज यांच्याकडे संबंधित महिला प्रवचन ऐकण्यासाठी येत असे. अनेक दिवसांपासून एकमेकांना हे दोघे ओळखत होते. यातून सचिन महाराज याने महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्या अत्याचार केला. महिलेच्या माहितीनुसार प्रवचनकार निलेश महाराज याने वारंवार अत्याचार केला.

(वाचा -  पुरेपूर कोल्हापूर! पैज जिंकली अन् मिळवल्या 8 बोकडाच्या मुंड्या, 32 पाय, रोख रक्कम)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात ही महिला राहते. तर निलेश महाराज हा डोंबिवली परिसरात राहतो. पीडित महिलेने गुरुवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. खडकपाडा पोलिसांनी प्रवचनकार निलेश महाजन याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. 

(वाचा -  बर्डथे सोबत, मृत्यूवेळीही एकत्रच; उत्तराखंड ट्रॅकिंग दुर्घटनेत जीव गमावलेल्या दाम्पत्याची करूणादायी कहाणी)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: