जाहिरात

अंबरनाथमध्ये 6 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, 23 वर्षाच्या नराधमाला चोपचोप चोपले

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित 6 वर्षीय मुलगी आणि 23 वर्षीय आरोपी राहातात.

अंबरनाथमध्ये 6 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, 23 वर्षाच्या नराधमाला चोपचोप चोपले
अंबरनाथ:

अंबरनाथमध्ये एका 6 वर्षीय चिमुकलीचा २३ वर्षीय नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित 6 वर्षीय मुलगी आणि 23 वर्षीय आरोपी एकाच परिसरात राहातात. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी रस्त्यावरून एकटी जात असल्याचं पाहून या नराधमाने तिला आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न केला.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नराधम तरूण तिला आपल्या सोबत घेवून जात होता. त्यामुळे ती चिमुकली रडू लागली. मुलगी रडत असल्याने तिथे असलेल्या लोकांच्या ही बाब लगेचच लक्षात आली. त्यानंतर लोकांनी या नराधमाला पकडून त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर काही लोकांनी या घटनेची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी यातरूणाला ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नराधमाला बेड्या ठोकल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसचा बालेकिल्ला भाजप भेदणार? कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना कोणाचे आव्हान?

काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्येही सर्वांनाच हादरवून सोडणारी घटना घडली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. त्यानंतर अशा आरोपींना जरब बसेल अशी अपेक्षा होती. पण राज्यात बलात्कार, विनयभंगाच्या घटना या होतच असल्याचे समोर येत आहेत. या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. बदलापूर प्रकरणात तर जनता रस्त्यावर उतरली होती. त्यांच्या रागाचा भडका उडाला होता. रेल रोको बरोबरच ज्या शाळेत हा प्रकार झाला तिथेही तोडफोड झाली होती. त्यानंतर सरकारने तातडीने पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अंबरनाथमध्ये ही घटना घडली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Puja Khedkar : पूजा खेडकरचा खेळ खल्लास, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
अंबरनाथमध्ये 6 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, 23 वर्षाच्या नराधमाला चोपचोप चोपले
man from Uttar Pradesh sold his 2-year-old son to save his wife and newborn baby
Next Article
गरिबीचा सौदा! बायको अन् नवजात बाळाला सोडवण्यासाठी त्यानं 2 वर्षांचा मुलाला विकलं