जाहिरात

Pune Crime News: खाऊचं आमिष दाखवलं, शाळेत निघालेल्या चिमुकली बरोबर भयंकर घडलं

पुण्यात शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चौथीच्या वर्गातील मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

Pune Crime News: खाऊचं आमिष दाखवलं, शाळेत निघालेल्या चिमुकली बरोबर भयंकर घडलं
पुणे:

शाळेत निघालेल्या चिमुकली बरोबर धक्कादायक घटना घडल्याचे पुण्यात समोर आले आहे. ही चिमुकली शाळेत जात असताना तिला एका नराधमाने खाऊचे आमिष दाखवे. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याघटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. 27 वर्षाच्या नराधमाने त्या चिमुकलीवर अत्याचार केले. त्याला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील वाघोली परिसरात ही घटना घडली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 पुण्यात  शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चौथीच्या वर्गातील मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पुण्याजवळील वाघोलीत सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.  वाघोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय 27 वर्षीय नराधम तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुटुंबीयांसह राहते. 

ट्रेंडिंग बातमी - Kunal Kamra:'चेहरे पे दाढी,आखो मे शोले', कुणाल कामराचं सोडा शिंदेंच्या सेनेची कविता एकदा ऐकाच

सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. पीडित मुलगी ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर पिठाची गिरणी आहे. आरोपी तरुण या पिठाच्या गिरणीत कामाला आहे. दरम्यान रोज ही मुलगी याच रस्त्याने शाळेत ये जा करत होती. हे आरोपी तरुणाला चांगलेच माहीत होते. सकाळी जेव्हा ती शाळेत जाण्यासाठी निघाली तेव्हा आरोपीने तिला अडवले. खाऊ देण्याचं अमिष दाखवलं आणि काम करत असलेल्या गिरणीत घेऊन गेला. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

ट्रेंडिंग बातमी - Shivsena Rada: शिंदेंच्या उपशहर प्रमुखाला महिलेने कानफटवले, शिंदेंच्या सेनेत चाललंय काय?

या संपुर्ण घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात अशा घटना गेल्या काही दिवसापासून वाढत आहेत. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आधी ही अशाच घटना शाळकरी मुलींबरोबर झाल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावर आहे. त्याच्या सुरक्षेसाठी काही तरी ठोस पावलं उचलली पाहीजेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुण्यात अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहात पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे.