ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात तरुण आणि तरुणी अडकले आहेत. त्यात अल्पवयीन मुलांची संख्या मोठी आहे. हा खेळ फक्त खेळा पुरता मर्यादीत राहात नाही. तर त्यातून काही गंभीर गुन्हेही होत आहेत. तसाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकचा एक तरुण 'फ्री फायर' ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून गडचिरोलीच्या तरुणीच्या संपर्कात आला. ती तरुणी अल्पवयीन होती. पुढे दोघांमध्ये प्रेमही झाले. त्यानंतर त्याने नाशिक सोडून थेट गडचिरोली गाठले. त्यानंतर पुढे जे झालं त्याने सर्वांनाच धक्का बसला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फ्री फायर हा ऑनलाईन गेम आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी हा 22 वर्षाचा तरुण तो नेहमी खेळत असे. हा गेम खेळता खेळता त्याची गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी इथल्या एका मुली बरोबर ओळख झाली. ती 14 वर्षाची होती. ऑनलाईन गेम खेळता खेळत हे दोघेही एकमेकां बरोबर चॅटींग करु लागले. त्यानंतर फोनवर बोलणं सुरू झाले. दोघांत चांगली मैत्री झाली.पुढे मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही दोन टोकाला राहात होते. आता त्यांना एकमेकांना भेटायचे होते. त्यातून भेट घेण्याचे दोघांनी ठरवलं.
मोहम्मद अन्सारी याने मालेगावातून अहेरीला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने नाशिकहून थेट मुलीचं गाव असलेलं अहेरी गाठलं. 11 जानेवारीला तो अहेरी गावाच पोहोचला. मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. हीच संधी साधत तो मुलीच्या घरी गेला. घरीच त्याने मुक्कामही केला. यावेळी त्यांने अल्पवयीन असलेल्या मुलीवर अत्याचारही केले. सकाळ झाल्यानंतर गावातल्या लोकांना त्या मुलीच्या घरात कुणी तरी अनोळखी व्यक्ती असल्याची कुणकुण लागली.
त्यामुलीच्या घरी गावकरी जमा झाले. त्यांनी त्यामुलाला ताब्यात घेतले. मुलीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी मुलीने झालेला सर्व प्रकार पोलिसांनी सांगितला. रात्री या मुलाने आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. तातडीने पोलिसांनी त्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली असून पुढील कारवाई आता पोलिस करत आहेत. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world