मित्राच्या बायकोकडे का बघतो? फक्त एवढंच विचारलं, त्यानंतर अख्खं कल्याण रेल्वे स्टेशन हादरलं!

मित्राच्या बायकोला का बघतोय अशी विचारणा केली म्हणून राग आल्याने दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एक विचित्र आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. मित्राच्या बायकोला का बघतोय अशी विचारणा केली म्हणून राग आल्याने दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.  धारदार शस्त्राने हा हल्ला केला. कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी अरुण कांबळे याला बेड्या ठोकल्या आहेत .

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्टेशनवर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काहीजण बुकिंग ऑफिस बाहेर उभे होते. त्यातील एक व्यक्ती एका महिलेकडे एकटक बघत होता. हे पाहून दिवा खेतकर या 28 वर्षीय तरुणाने त्या व्यक्तीला जाब विचारला. 

लेकीच्या अपहरणानंतर बापाचा प्रताप उघड; सूड उगवण्यासाठी घरातील बांगलादेशी मुलीने रचला कट

तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय, अशी विचारणा दिवा खेतकर याने केली. मात्र याचा समोरच्या व्यक्तीला इतका राग आला की त्याने आपल्या जवळ असलेल्या धारदार चाकूने दिवा याच्याबर हल्ला केला. दिवाच्या मानेवर वार केल्याने तो जखमी झाला. यावेळी दिवा याला वाचवण्यासाठी गेलेला राजू राऊळ याच्यावर देखील आरोपीने हल्ला केला.

Advertisement

EXCLUSIVE : 'आम्हाला कसलीही भीती नाही, मृत्यू...' CM शिंदेंच्या भेटीनंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया

राजू  देखील या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे.  घटनेची माहिती मिळतात कल्याण जीआरपीने तत्काळ आरोपी अरुण कांबळे याला अटक केली असून गुन्हा देखील दाखल केला आहे. अरुण चंदननगर खडवली येथील राहतो. अरुण याला अटक करत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे रेल्वे स्टेशन परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण होतं.  

Advertisement


Topics mentioned in this article