
आई आणि मुलगा यांचं नातं हे अतुट असतं. आई आपल्या मुलाची काळजी ही अगदी लहानपणापासून तळहाताच्या फोडा प्रमाणे घेते. तर मुलगा ही वयोवृद्ध आईची काळजी घेत असतो. दोघे ही सुखादुखात एकमेकांना साथ देतात. हेच नातं आई मुलाचं असतं. पण या नात्यालाच हारताळ फासण्याची घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये घडली आहे. इथं एका मद्यपी मुलानं आईचाच घात केला. त्याने केलेल्या कृत्याने संपूर्ण जिल्ह्याच हादरून गेला आहे. एखादा मुलगा संपत्तीसाठी असा काही कट रचू शकतो याने सर्वच जण हैराण झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वनिता प्रकाश चामे या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आहे. महादेववाडीत त्यांची वडीलोपार्जित शेती आहे. या गावात त्या आपला मुलगा विक्रम चामे याच्या बरोबर राहातात. विक्रम याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यात त्याला शेती आपल्या नावावर आईने करावी असं वाटत होता. त्यासाठी तो सतत आईच्या मागे लागला होता. पण मुलगा चांगल्या वळणाचा नाही हे आईला माहित होते. त्या जमिनीवरच घर चालत होते. त्यामुळे आईने ती जमिन त्याच्या नावावर करण्यास नकार दिला होता. हा राग त्याच्या मनात होता. त्यातूनच त्याने एक भयंकर कट रचला.
आई घरी रात्रीच्या वेळी गाढ झोपेत होते. त्याच वेळी त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने ती झोपेत असताना तिच्या डोक्यात धारधार कुऱ्हाडीने वार केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. आईला ठार केल्याने या क्रुरकर्म्याने हा घातपात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने आईचा मृतदेह इमारतीवरून खाली फेकला. शिवाय पुरावे नष्ठ करण्यासाठी रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले.
त्याने आपल्या आईचा घात झाल्याचा बनाव त्याने केला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी ही तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्याच वेळी पोलिसांना काही तरी वेगळं घडलं असल्याचा संशय आला. त्यांनी याबाबत मुलाकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने जमीनीच्या वादातून आपण आईचा खून केल्याची कबूली दिली. बहिणीच्या तक्रारीवरून आरोपी मुलाच्या विरोधात अहमदपूर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world