पुण्यात नामांकित व्यावसायिकाला तब्बल चार कोटी रुपयांचा गंडा घालणारी रिल स्टार गुडिया उर्फ सानिया सिद्दीकीला पुणे पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेली सानिया पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेली होती. एका बाजूला सोशल मीडियावर रिल बनवणारी ही सानिया सायबर चोर आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या सानियाने अनेक लोकांना सायबर चोरीचा सापळा रचून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.
नक्की वाचा - Video : इतकं मारलं की, आयुष्यभर मुलींच्या आजूबाजूला फिरकणार नाही; 'रणरागिणी'चं रुप पाहून भले भले अवाक्
फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील एका नामांकित बिल्डरलासुद्धा चार कोटी रुपयांचा गंडा घातला होता. त्यावेळी पुणे पोलिसांनी तिला परराज्यातून अटक केली होती. मात्र रेल्वेच्या प्रवासादरम्यान ती पोलिसांच्या तावडीतून पळून गेली. या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या सहा जणांना निलंबित करण्यात आलं होतं. 10 महिन्यांपासून पुणे पोलिसांच्या सायबर विभागाच्या रडारवर असलेली गुडिया अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यात सायबरअंतर्गत गुन्हा दाखल...
सानियावर न्याती इंजिनियर्स अँड कन्सल्टेंट कंपनीने चार कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप केला आहे. कंपनीच्या जीएम सागर जयंतीलाल बोरांनी पुणे सायबर ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. महाराष्ट्र पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात हरियाणाच्या मुरादाबादहून अटक करण्यात आली होती. पुण्याला घेऊन जात असताना दुरांतो एक्स्प्रेसमधून उडी मारून फरार झाली होती. यानंतर सहा पोलीस कर्मचारी, ज्यात एका अधिकाऱ्याचा समावेश होता, त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.