Amravati News: 15 दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले तापलेल्या विळ्याचे 12 चटके, ‘डम्मा’ अघोरी प्रकाराचा पर्दाफाश

मेळघाटातील चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील रेट्याखेडा येथे एका 15 दिवसांच्या बालकावर अघोरी उपचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Amravati Crime News Latest Update

शुभम बायस्कर, प्रतिनिधी 

Amravati Crime News Today :  मेळघाटातील चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील रेट्याखेडा येथे एका 15 दिवसांच्या बालकावर अघोरी उपचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोट फुगल्याच्या त्रासावर उपचार करण्याच्या नावाखाली गावातील 65 वर्षीय भुलई जामुनकर या महिलेने भयंकर प्रकार केला आहे. तिने बालकाच्या पोटावर तप्त विळ्याचे 11 ते 12 चटके दिले. या संतापजनक घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. 

वृद्ध महिलेवर चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

मेळघाटात या अघोरी व अनिष्ट उपचारपद्धतीला ‘डम्मा'असे म्हटले जाते. पोटफुगीमुळे तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. आरोपी महिलेने चुलीवर विळा तापवून बालकाला चटके दिले. या अमानुष प्रकारामुळे चिमुकलीला तीव्र वेदना झाल्याने तिला तातडीने सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. चिखलदराचे ठाणेदार प्रवीणकुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत मुलीच्या आईनेच तक्रार दिली. त्यावेळी त्या 65 वर्ष वृद्ध महिलेवर चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

नक्की वाचा >> सेंट विल्फ्रेड महाविद्यालय व्यवस्थापनाला शिवसेना-युवासेनेचा 7 दिवसांचा अल्टिमेटम, मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात

मेळघाटातील काही भागांत लहान मुलांचे पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित आजारांवर ‘डम्मा'देण्याची अघोरी उपचारपद्धती आजही प्रचलित आहे. प्रत्यक्षात या प्रकारामुळे नवजात आणि लहान मुलांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. तसेच त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. गेल्या दोन वर्षांत मेळघाटात अशा प्रकारची समोर आलेली ही तिसरी घटना असल्याने मेळघाटात जनजागृतीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

नक्की वाचा >> KDMC News: 18 वर्षांपासून एकाच पदावर 2 अधिकारी कार्यरत, केडीएमसीत चाललंय तरी काय? अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी