Delhi News : दिल्लीतील शाहदरामधील जगतपुरी एक्सटेंशनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीतून लोखंडाच सळई अंगावर पडल्याने पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी साधारण 11 वाजता मुलगी दुर्गा मंदिरातून परतत होती. त्याचवेळी एक लोखंडी सळई तिच्या अंगावर पडली. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात इमारतीचा मालक नाथू सिंह आणि तेथे काम करणाऱ्या तीन मजुरांना अटक केली आहे.
ICU मध्ये उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू
या भयंकर घटनेनंतर मुलीला तातडीने जीटीबी रुग्णालयात हलविण्यात आलं. मुलीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. यादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलीच्या वडिलांचा जबाब घेतला. त्याच्या आधारावर काम सुरू असलेल्या इमारतीच्या मालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा - साध्या-भोळ्या चेहऱ्यामागे गुन्हेगारीचा कळस ; मुस्कानचा फोटो शेअर पोलिसांनी तरुणांना केलंय अलर्ट
लोखंडाची सळई डोक्यात घुसल्याने मुलगी जखमी
थरकाप उडवणारी ही घटना दिल्लीतील जगतपुरी एक्सटेंशनमध्ये रविवारी सकाळी 11 वाजता घडली. या अपघातावेळी मुलगी तेथून जात होती. पोलिसांना सकाळी 11 वाजता पीसीआर कॉलच्या माध्यमातून या घटनेबाबत माहिती मिळाली. लोखंडाची सळई डोक्यात पडल्याने मुलगी गंभीर जखमी होती. मिळालेल्या माहितीनुसार, चार मजली इमारतीच्या छतावर पाण्याच्या टाकीसाठी लोखंडाच्या सळईचा वापर केला जात होता. सळई अचानक पडी आणि मुलीच्या डोरक्यात पडली. ज्यामुळे तिचा डावा डोळा आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.