
Delhi Triple Murder: दक्षिण दिल्लीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे एका घरातून तीन मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घर पूर्णपणे सील केले आणि पुढील पुरावे गोळा करत आहेत. डीसीपींनी सांगितले की, "एका कॉलरने पीसीआर कॉलमध्ये सांगितले की, एका मुलाने स्वतःचा हात कापला आहे, तिथे खूप रक्त वाहत आहे आणि मदतीची गरज आहे. मैदान गढी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिले की तळमजल्यावर रक्ताने माखलेले दोन मृतदेह पडले होते आणि पहिल्या मजल्यावर एका महिलेचा मृतदेह होता."
घरात सापडले 3 मृतदेह
हे प्रकरण दक्षिण दिल्लीतील मैदानगढी परिसरातील आहे. इथे आई, वडील आणि 2 मुले राहत होते. दिल्लीच्या सतबाडी खर्क गावातून पोलिसांना एक पीसीआर कॉल आला होता की एका घरात लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. पोलिसांनी येऊन आतले दृश्य पाहिले, ते खूपच भयानक होते. पहिल्या मजल्यावर वडील आणि मुलाचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता, तर दुसऱ्या मजल्यावर आईचा मृतदेह तोंड बांधलेल्या अवस्थेत आढळला. तिघांचाही मृत्यू झाला होता. मृतांमध्ये प्रेम सिंह (50), रजनी (45) आणि ऋतिक (24) यांचा समावेश आहे. एक मुलगा सिद्धार्थ फरार आहे. आरोप आहे की, धाकट्या मुलानेच चाकूने भोसकून आणि विटांनी ठेचून आई-वडील आणि भावाची हत्या केली आणि तो फरार झाला.
( नक्की वाचा : Nora Fatehi : बायकोनं नोरा फतेही सारखं दिसावं म्हणून 3 तास जिम करायला लावायचा नवरा ! वाचा काय आहे प्रकरण? )
दुसरा मुलगा बेपत्ता
पोलिसांना कुटुंबातील चौथा सदस्य सिद्धार्थ घरातून बेपत्ता आढळला. स्थानिक लोकांकडून चौकशी केल्यावर असे समजले की सिद्धार्थवर मानसिक आजाराचे उपचार चालू होते. एवढेच नाही, प्राथमिक तपासणीत हे देखील समोर आले की सिद्धार्थने कुणाला तरी सांगितले होते की त्याने आपल्या कुटुंबाची हत्या केली आहे आणि आता तो इथे राहणार नाही.

दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी दिली माहिती
तिन्ही मृतदेहांचे फोटो घेण्यात आले आहेत आणि पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, सिद्धार्थचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, घरातून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. इथे आल्यावर या घटनेबद्दल समजले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world