Judge Death Case: न्यायाधीशाची आत्महत्या की हत्या? जज पत्नीसह IAS मेहुणीविरोधात गुन्हा, तपासात मोठा ट्विस्ट

Judge Death Case: न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण प्राप्त झाले आहे. पत्नी स्वाती मलिक आणि आयएएस मेहुणी निधी मलिक यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल. वाचा सविस्तर घटनाक्रम.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Judge Aman Kumar Sharma Death Case: न्यायाधीशाच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट"
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • न्यायाधीश अमन कुमार शर्माच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल
  • मृत न्यायाधीशाच्या पत्नी स्वाती मलिक, मेहुणी निधी मलिक आणि अन्य नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल
  • अमन कुमार शर्मा यांनी बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Judge Aman Kumar Sharma Death Case: न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. अमन कुमार शर्मा यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दक्षिण दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला असून यात प्रामुख्याने आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि गुन्हेगारी कट रचणे यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात मृताची पत्नी, मेहुणी आणि अन्य नातेवाईकांना आरोपी करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार तीस हजारी न्यायालयातील न्यायाधीश स्वाती मलिक (मृत व्यक्तीची पत्नी) आणि जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी निधी मलिक (मृत व्यक्तीची मेहुणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय स्वाती मलिकचे आई-वडील आणि अन्य एका व्यक्तीचाही आरोपींच्या यादीत समावेश आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Amravati News : चुंबन घेऊन फोटो काढला अन् घात झाला; सोशल मीडियावरील ओळखीतून अत्याचाराची धक्कादायक घटना)

पोलिसांची कारवाई  

दिल्ली पोलिसांनी मृत व्यक्तीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) आणि कलम 61(2) (गुन्हेगारी कट रचणे) यानुसार गुन्हा नोंदवून सखोल तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रकरणातील प्रत्येक पैलूची बारकाईने चौकशी केली जाईल आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर पावले उचलली जातील.

(नक्की वाचा: Amravati News : SIT तपासादरम्यान संशयित कर्मचाऱ्यांची सुटका? परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात वादग्रस्त आदेश)

30 वर्षीय न्यायाधीश अमन कुमार शर्मा शनिवारी (2 मे) दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी मृतावस्थेत आढळले होते. ते कडकडडूमा न्यायालयातील दिल्ली विधी सेवा प्राधिकरणात सचिव म्हणून कार्यरत होते. सुरुवातीला ही घटना निव्वळ आत्महत्या वाटत असली, तरी कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आता या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

Photo Credit: NDTV Marathi

न्यायाधीशाने बाथरूममध्ये फाशी लावून केली आत्महत्या

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पोलिसांना एक कॉल आला. हा कॉल अमन शर्मा यांचे भावोजी शिवम यांनी केला होता, जे डिफेंस कॉलनीमध्ये राहतात. अमनने स्वतःच्या घरातील बाथरूममध्ये फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती फोनद्वारे पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला. 

अमन यांच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नातेवाईक राजेश शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अमन हे पत्नी स्वाती मलिक आणि मेहुणी निधी मलिक यांच्याकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे प्रचंड तणावाखाली होते. याच जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.

Advertisement