जाहिरात

Amravati News : SIT तपासादरम्यान संशयित कर्मचाऱ्यांची सुटका? परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात वादग्रस्त आदेश 

परतवाडा येथील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात धक्कादायक घडामोड समोर आली आहे.

Amravati News : SIT तपासादरम्यान संशयित कर्मचाऱ्यांची सुटका? परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात वादग्रस्त आदेश 
(पोलीस अधीक्षक विशाल आनंद)

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati News : परतवाडा येथील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात तपास करणाऱ्या SIT चे काम पूर्ण होण्यापूर्वीच तत्कालीन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तीन संशयित पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून थेट मूळ पोलीस स्टेशनला परत पाठवले आहे. ३० एप्रिल रोजी काढलेल्या या आदेशाची प्रत NDTV मराठीच्या हाती आली आहे. या आदेशाने तपास यंत्रणेच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

कोण आहेत हे तीन कर्मचारी?

परतवाडा प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये यासाठी तिघांना अमरावती ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या पोलीस नियंत्रण कक्षाला अटॅच करण्यात आले होते. पोहवा/१४८९ पुरुषोत्तम मधुकर बावनेर (पो.स्टे. अचलपूर), पोहवा/१९६९ मोहन धनराज वावरे (पो.स्टे. अचलपूर) आणि पोहवा/४१७ अब्दुल नाझीम अब्दुल करीम (पो.स्टे. परतवाडा). SIT तपास सुरू असतानाच या तिघांना मूळ स्थानावर परत पाठवणे हे अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे.

नक्की वाचा - Amravati News : एक तरुण, 180 मुली, 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; अमरावतीत खळबळ 

(परतवाडा प्रकरण जाणून घेण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा)

SIT चा तपास पूर्ण होण्यापूर्वीच सुटका का केली?

तत्कालीन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी काढलेल्या आदेशात या कर्मचाऱ्यांना परत का पाठवले याचे कोणतेही कारण नमूद नाही. SIT तपास पूर्ण होण्यापूर्वी संशयित कर्मचाऱ्यांना मूळ स्थानावर पाठवणे म्हणजे चौकशी समिती किंवा चौकशी प्रभावित होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांचा चौकशीत हस्तक्षेप होऊ नये म्हणून त्यांना अटॅच केले होते. मग SIT चा तपास पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची सुटका कशासाठी? हे तीनही कर्मचारी दोषमुक्त झाले का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील प्रकरणात SIT गठीत करण्यात येते ती तपासाची निष्पक्षता राखण्यासाठी. मात्र तपास पूर्ण होण्यापूर्वीच संशयित कर्मचाऱ्यांना मूळ स्थानावर परत पाठवणे हे तपासाला खो देण्यासारखे असून कोणाच्या दबावाखाली हा आदेश काढण्यात आला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. 'या संदर्भात नूतन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना विचारले असता या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन प्रतिक्रिया देणे उचित ठरेल असे स्पष्ट केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com