- दिल्ली पुलिस स्पेशल सेल ने महाराष्ट्र के कोल्हापुर से गैंगस्टर कपिल सांगवान के दो शार्पशूटरों को गिरफ्तार किया
- आरोपी सौरभ लाकड़ा और योगेश शर्मा झज्जर के थाना बादली इलाके में हुए मर्डर केस में वांटेड थे
- पुलिस ने आरोपियों की लोकेशन मिलने पर महाराष्ट्र में सौ से अधिक होटलों की जांच कर 28 जनवरी को गिरफ्तारी की
Crime News : दिल्ली पोलिसांच्या स्पेशन सेलला मोठं यश मिळालं आहे. कुख्यात गँगस्टर कपिल सांगवान उर्फ नंदू याच्या दोन शार्पशूटर सौरभ लाकडा आणि योगेश शर्मा याला कोल्हापुरातील अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल ४५०० किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला.
कोणत्या केसमध्ये अटक?
हे दोन्ही आरोपी हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बादली पोलीस स्टेशन परिसरातील झालेल्या एका खून प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होते. योगेश शर्मावर झज्जर पोलीस आयुक्तांनी बक्षीस जाहीर केले होते, तर सौरभ लाक्रा दिल्लीतील दोन गंभीर प्रकरणांमध्ये फरार गुन्हेगार होता. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिणी रेंजच्या स्पेशल सेलला आरोपीच्या ठिकाणाबाबत विश्वसनीय माहिती मिळाली. त्यानंतर, निरीक्षक पवन कुमार आणि निरीक्षक सुमित काद्यान यांच्या नेतृत्वाखाली एक पथक महाराष्ट्राकडे रवाना झाले.
या स्पेशल टीमने १०० हून अधिक हॉटेल आणि गेस्ट हाऊसचा शोध घेतला. शेवटी २८-२९ जानेवारीच्या रात्री कोल्हापूरच्या उंचगाव रोड, श्री तेबंलाई मंदिराजवळ त्यांना पकडण्यात आलं. दोन्ही आरोपी संदीप उर्फ बबलूच्या हत्या प्रकरणात फरार होते. १७ जुलै २०२५ रोजी संदीप आपल्या मित्रांसोबत कारमधून जात होता, तेव्हा दुचाकीवरील तरुणांनी त्याच्यावर गोळीबार केला. ज्यात संदीपचा मृत्यू झाला. तपासानुसार, ही हत्या कपिल सांगवाल उर्फ नंदूच्या इशाऱ्यावरुन करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिल्ली आणि हरियाणात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, लूट आणि शस्त्रास्त्र कायद्यासह १० हून अधिक गंभीर प्रकरणांमध्ये सहभागी आहेत. योगेशविरुद्ध अनेक प्रकरणांमध्ये गैरहजर राहण्याची वॉरंट जारी करण्यात आली होती, तर सौरभला आधीच फरार घोषित करण्यात आले होते. चौकशीदरम्यान दोघांनीही सांगितले की, त्यांनी मध्य प्रदेशातून देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले होते, जे दिल्लीतील एका सुरक्षित घरात लपवून ठेवले होते.