जाहिरात

Shocking: 'भ्रष्टाचारातून पैसा, अय्याशीसाठी थायलंड'; Deputy Collector पतीची पत्नीकडूनच पोलखोल

Shocking News : भ्रष्ट उपजिल्हाधिकाऱ्याच्या गैरव्यवहाराची पोल त्याच्या पत्नीनंच उघड केल्याचं एक प्रकरण समोर आलंय.

Shocking: 'भ्रष्टाचारातून पैसा, अय्याशीसाठी थायलंड'; Deputy Collector पतीची पत्नीकडूनच पोलखोल
Shocking News : या आरोपांशी संबंधित पुरावे देखील पत्नीनं सादर केले आहेत.
मुंबई:

Shocking News : सरकारी अधिकाऱ्यांच्या गेैरव्यवहाराचे तसंच बेहिशेबी संपत्तीचे प्रकरणं काही नवी नाहीत. यापूर्वी देखील या प्रकारचे अनेक उदाहरणं उघड झाली आहेत. पण, भ्रष्ट उपजिल्हाधिकाऱ्याच्या गैरव्यवहाराची पोल त्याच्या पत्नीनंच उघड केल्याचं एक प्रकरण समोर आलंय. इतकंच नाही तर आपल्या नवऱ्या सरकारची कोणतीही परवानगी न घेता अय्याशी करण्यासाठी थायलंडवारी केल्याचा गौप्यस्फोट देखील पीडित पत्नीनं केला आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैनमधील हे प्रकरण आहे. येथील एका एका उप-जिल्हाधिकाऱ्याच्या (Deputy Collector) कथित भ्रष्टाचार आणि अवैध कृत्यांची पोल खुद्द त्यांच्या पत्नीने उघड केली आहे. सध्या भोपाळ मुख्यालयात संलग्न असलेल्या या अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासनाकडे गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील जालौन येथील रहिवासी तबस्सुम बानो यांनी मंगळवारी जनसुनावणीमध्ये एसडीएम एल.एन. गर्ग यांच्यासमोर हजर होऊन त्यांचे पती मोहम्मद सिराज मन्सूरी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )

काय आहेत आरोप?

तब्बसूम बानो यांनी केलेल्या आरोपानुसार  मन्सूरी यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि याच पैशातून मालमत्ता जमवली. त्याचबरोबर मन्सूरी यांनी नातेवाईकांच्या नावावर छिंदवाडा, इंदूर आणि जबलपूर येथे भूखंड (प्लॉट), घरे आणि लक्झरी वाहने खरेदी केली आहेत.

इतकंच नाही तर त्यांनी सरकारची  परवानगी न घेता मौजमजा करण्यासाठी इराक, दुबई आणि थायलंड येथे वारंवार प्रवास केला, असा धक्कादायक आरोपही तब्बसुम यांनी केलाय. त्यांनी या तक्रारीशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ देखील सादर केली आहेत.  

( नक्की वाचा : Akola News: '700 व्यापाऱ्यांचा रोजगार धोक्यात'; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अकोल्यात मोठा संघर्ष पेटणार? )

जीवे मारण्याची धमकी आणि....

तबस्सुम बानो यांनी पतीवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे.  2008 मध्ये मन्सूरी तहसीलदार असताना त्यांचा विवाह झाला आणि एक वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला. नंतर बदली झाल्यावर ते दुसऱ्या शहरात राहायला गेले.

तिथे त्यांना पतीचे इतर महिलांशी अवैध संबंध असल्याचे समजले, ज्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाले. तेव्हापासून मन्सूरी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. परदेशात जाताना पती मोहम्मद सिराज मन्सूरी सरकारी सीम बंद ठेवत असत आणि तिथे दुसऱ्या देशाचे सीमकार्ड वापरून परत आल्यावर ते सीमकार्ड तोडून टाकत असत, असेही तबस्सुम यांनी सांगितले.

लोकायुक्तांकडून चौकशी 

मोहम्मद सिराज मन्सूरी यांच्यावर उज्जैनमध्ये एसडीएम असतानाच लोकायुक्त विभागाने चौकशी सुरू केली होती. सुमारे 1 वर्षांपूर्वी उज्जैनमध्ये एसडीएम असताना त्यांच्यावर एका मशिदीला 3 लाख रुपये मिळवून दिल्याचा आरोप होता. लोकायुक्त चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांची भोपाळ येथे बदली झाली.

तबस्सुम यांनी जवळपास 1 आठवड्यापूर्वी इंदूर येथे जनसुनावणीत तक्रार केली होती. मंगळवारी उज्जैन येथे तक्रार घेऊन गेल्यावर त्यांना जिल्हा पंचायत सीईओ यांनी एसडीएमकडे, आणि एसडीएम यांनी तहसीलदारांकडे पाठवले. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक (SP) यांच्याकडे तक्रार करण्याची सूचना देऊन परत पाठवण्यात आले.

मन्सूरी यांचा कार्यकाळ आणि पासपोर्टची चौकशी केली, तर सर्व सत्य समोर येईल, असा दावा तबस्सुम बानो यांनी केला आहे. या प्रकरणी उप-जिल्हाधिकारी मन्सूरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कॉल स्वीकारला नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com