भाविकांसोबत रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भयंकर घडलं, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

रात्रीच्या वेळी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात 7 ते 8 दरोडेखोरांनी येऊन बाईंगडे आणि पाटील कुटुंबाला चाकूचा आणि शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांना सांगलीच्या कळंबी येथे  लुटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 7 ते 8 दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत या भाविकांना लुटले. लुटीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळाळेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर येथील चंद्रकांत बाईंगडे आणि बाळजी पाटील हे आपल्या कुटुंबासह क्रूजर गाडीतून तुळजापूर, पंढरपूर दर्शन करून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले होते. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून निघाले असता, मिरज तालुक्यातल्या कळंबी येथे ते एका पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी थांबले होते. 

(नक्की वाचा - हेलिकॉप्टर हवेत गर गर फिरलं अन् जमिनीवर आदळलं, केदारनाथमधील दुर्घटनेचा थरारक VIDEO)

दरम्यान रात्रीच्या वेळी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात 7 ते 8 दरोडेखोरांनी येऊन बाईंगडे आणि पाटील कुटुंबाला चाकूचा आणि शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला आहे.

(नक्की वाचा- बोट दुर्घटनेमुळे आता कोकण हादरलं; 7 खलाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली)

पीडित बाळाजी पाटील यांनी या थरारक अनुभवाबद्दल सांगितलं की, आम्ही रात्रीच्या वेळी पेट्रोलपंपावर विश्रांतीसाठी थांबलो होतो. चोरट्यांनी तिथे येत आम्हाला मारहाण करत आमच्याकडील सोनं आणि रोख रोक्कम लुटली. जवळपास 15 हजार रुपयांचा रोख रक्कम, सोन्याचं मंगळसूत्र, झुमके आणि नेकलेल चोरट्यांनी लुटल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

Advertisement
Topics mentioned in this article