जाहिरात
This Article is From Jan 25, 2025

black magic: कान कापलेला बोकड, पाय बांधलेल्या कोंबड्या अन् स्मशानभूमी, मध्यरात्री काय घडलं?

स्मशानभूमी शेजारी एका शेतकऱ्याचे घर आहे. रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे त्या शेतकऱ्याच्या लक्षात आले.

black magic: कान कापलेला बोकड, पाय बांधलेल्या कोंबड्या अन् स्मशानभूमी, मध्यरात्री काय घडलं?
धुळे:

अंधश्रद्धेला चाप लागावा यासाठी सरकारने कायदा आणला आहे. पण या कायद्याचा म्हणावा तसा धाक राहीला नाही. त्यामुळेच राज्यात सर्रास भोंदुगिरी, जादूटोना,पशूबळी, मंत्रतंत्राचे प्रकार समोर येत असतात. या गोष्टींवर अनेक ठिकाणी आजही अंध विश्वास ठेवला जातो. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या माध्यमातून जनजागृती सुरू असते. तरी ही जादूटोना, बुवाबाजी असे प्रकार होताना दिसत आहेत. असाच एक प्रकार आता धुळ्यातील मोहाडी प्र.डांगरी या गावात समोर आला आहे. इथं स्मशानभूमीत मध्यरात्रा अघोरी पुजा केली जात होती. गावकऱ्यांच्या हे लक्षात आलं. त्यानंतर ते तिथे जेव्हा पोहोचले त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

धुळे जिल्ह्यात मोहाडी प्र.डांगरी हे छोटं गाव आहे. अन्य दिवसा प्रमाणे यागावातले लोक रात्री झोपले होते. वेळ मध्य रात्रीची होती. त्यामुळे गावात चिटपाखरूही नव्हते. गाव शांत झोपलं होतं. त्याच वेळी गावातील एका ठिकाणी काही जण जागे होते. ते एक भयंकर कृत्य करत होते. ती जागा होती गावातल्या स्मशानभूमीची. स्मशानभूमी शेजारी एका शेतकऱ्याचे घर आहे. रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे त्या शेतकऱ्याच्या लक्षात आले. तिथं एका पेक्षा जास्त लोक होते. त्यामुळे त्याने बॅटरी घेवून कोण लोक आहेत हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या कडची बॅटरी त्या लोकांच्या दिशेने रोखली. काळोखात अचानक प्रकाश आल्याने तिथल्या लोकांनी पळ काढला. त्यानंतर सर्व गावकरी तिथे जमा झाले. 

ट्रेंडिंग बातमी - Jitendra Awhad: "अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही.." जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक विधान

ज्यावेळी त्यांनी स्मशानभूमीतलं चित्र पाहीलं त्यावेळी ते सर्वच जण हादरून गेले. स्मशानभूमीत  मान कापलेला बोकड ठेवला होता. शिवाय त्याच्या बाजूलाच पाय बांधलेल्या दोन कोंबड्या ही होत्या. शेकडो लिंब ठेवण्यात आली होती. त्याच्या भोवती कवड्या ही होत्या. ही सर्व तयारी अघोरी पुजेची होती. ज्या अघोरी पुजा केल्या जातात त्यासाठी लागणारेच हे साहित्य होतं असं गावकरी सांगत आहेत. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. अघोरी पुजा करण्यासाठी आलेले सोबत चारचाकी घेवून आले होते हे ही समोर आले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Tahawwur Rana : मुंबई 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला भारतात आणणार, तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी

धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 35 वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम जोरात सुरू आहे. अशा स्थितीत तालुक्यात अशी घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणा संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष असलेले अविनाश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा डिसेंबर 2013 मध्ये लागू झाला. पण याबाबत लोकांमध्ये या कायद्या विषयी जागृती म्हणावी तशी झालेली नाही. त्यामुळेच अशा घटना होत आहेत. त्यांना कायद्याचा धाक राहीलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. अशा घटना होणे हे दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com