गॅस वितरकाचा आत्महत्येचा प्रयत्न; गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये भयंकर घडलं

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील एचपी गॅस वितरक ज्ञानेश्वर माळी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील एचपी गॅस वितरक ज्ञानेश्वर माळी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीदरम्यान हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या घटनेमुळे गॅस वितरण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

१,२०० गॅस सिलिंडरची तफावत...

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीकडून करण्यात आलेल्या तपासणीत गॅस स्टॉक आणि वितरण यामध्ये तफावत आढळून आल्याची चर्चा आहे. तब्बल १ हजार २०० सिलिंडरची तफावत असून त्याची किंमत जवळपास सात लाख रुपये इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्यावर रिकव्हरी प्रलंबित असल्याने गॅस पुरवठाही बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या तणावातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

नक्की वाचा - Ulhasnagar News : रात्रीतून बाईक गायब; CCTV पाहताच पोलीस हादरले, चोरांची Modus Operandi उघड

आत्महत्येच्या प्रयत्नानंतर ज्ञानेश्वर माळी यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. सध्या जिल्ह्यात आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना, गॅस वितरकाने कंपनीच्या बैठकीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे