जाहिरात

Ulhasnagar News : रात्रीतून बाईक गायब; CCTV पाहताच पोलीस हादरले, चोरांची Modus Operandi उघड

बाईक सुरू करायला ओरिजनल चावीही आवश्यकता नाही, बाईक लावताना ही चूक अजिबात करून नका.

Ulhasnagar News : रात्रीतून बाईक गायब; CCTV पाहताच पोलीस हादरले, चोरांची Modus Operandi उघड

Ulhasnagar News : हातात बाईकच्या डुप्लीकेट चाव्यांचा गुच्छा आणि शोध बाईकचा. दिवसभरात एका बाईक मिळाली त्या बाईकला चावी लावायचा आणि शहरभर फिरायचा. पेट्रोल संपले की, ती बाईक एका ठिकाणी लावून द्यायचा. उल्हासनगरातील अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस चक्रावले आहे. या दोन्ही अल्पवयीन मुलांकडून सहा महागड्या दुचाकी सापडल्या आहे. त्यांच्याकडून आणखीन काही बाईक हस्तगत होतील अशी शक्यता उल्हासनगर पोलिासांनी वर्तविली आहे. 

अशी करायचे चोरी...

काही दिवसांपासून उल्हासनगर शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहे. एखाद्या रस्त्याच्या कडेला उभी असली दुचाकी आणि घराबाहेर उभी केलेल्या बाईक अचाकन गायब झाल्या. उल्हासनगरचे उपायुक्त सचिन गोरे यांनी या दुचाकी चोरी प्रकरणात शोध घेण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशनला दिले. एका ठिकाणी सीसीटीव्हीत एक घटना कैद झाली होती. या सीसीटीव्हीत दिसत होते की, दोन तरुण  एका बाईकला चावी लावून ती बाईक घेऊन गेले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. जे काही समोर आले ते अतिशय धक्कादायक होते.

नक्की वाचा - Ambernath News : आमदार किसन कथोरेंनी अंडरवर्ल्ड गँगस्टरला दिली पनवेलकरांची सुपारी? 'त्या' पत्रामुळे खळबळ 

दोन अल्पवयीन मुले बाईक चालविण्याचा शौक पूर्ण करण्याकरीता या बाईक चोरी करीत होते. बाईकवर फिरून झाल्यावर तीच चोरी केलेली बाईक एका ठिकाणी साठा करुन ठेवत होते. हे दोन्ही अल्पवयीन तरुणांकडे डुप्लीकेट चाव्यांचा गुच्छा होता. त्यापैकी कोणतीही डुप्लीकेट चावी लावून  बाईक चोरी करीत होती. यांच्याकडून सहा बाईक हस्तगत केल्या आहेत. अजून ही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या बाईक चोरीचा छडा लावला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com