जाहिरात

Dombivli : डोंबिवलीतील सोसायटीत राडा, हळदी-कुंकूला विरोध, अपशब्दाचा वापर; मराठी विरुद्ध अमराठी आपसात भिडले

डोंबिवली नांदीवलीमधील एका सोसायटीत सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबीयांनी विरोध केला.

Dombivli : डोंबिवलीतील सोसायटीत राडा, हळदी-कुंकूला विरोध, अपशब्दाचा वापर; मराठी विरुद्ध अमराठी आपसात भिडले

मुंबईसह आजूबाजूच्या भागात मराठी आणि अमराठी वाद वाढत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्येही मराठी तरुणाला परप्रांतीय रिक्षाचालकाकडून मारहाण करण्यात आली होती. मुंबईत तर अमराठींनी मराठी तरुणीला भाड्याने घर देण्यास नकार दिला होता. मुंबईत अशा घटना समोर आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या मराठीबहुल भाग म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीतील (Dombivli News) एका सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळल्याचं दिसून येत आहे. सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठी रहिवाशांनी विरोध केला. त्यामुळे मराठी आणि  अमराठी आपापसात भिडले. पुढे हे प्रकरण इतकं वाढलं की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. 

Chhaava Controversy : छावा चित्रपटाचा वाद मिटणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर काय म्हणाले?

नक्की वाचा - Chhaava Controversy : छावा चित्रपटाचा वाद मिटणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर काय म्हणाले?

कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला आहे. डोंबिवली नांदीवलीमधील एका सोसायटीत सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबीयांनी विरोध केला. त्यांनी मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबांतील महिलांनी केला आहे. काल २७ जानेवारीला रात्री सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: