अमजद खान, प्रतिनिधी
Dombivli Crime News : पती-पत्नीच्या वादात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींची हत्या झाल्याचे धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे एका घटनेत पती-पत्नीच्या वाद सुरू असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्ती मध्यस्थी करण्यास गेला त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली, तर दुसरीकडे भावजय आणि भावाचा भांडण सुरू असताना मध्यस्थी करायला गेलेल्या दिराची भावजयीनं हत्या केलीय. या हत्येनंतर भावजयीनं हाताची लस कापून घेतलीय. या दोन प्रकरणापैकी एकामध्ये आरोपीला अटक करण्यात आलीय. तर दुसऱ्या आरोपीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाणे आणि त्याची पत्नी संगीता मेंगाणे या दोघांमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते. रविवारी दुपारी देखील या दोघांमध्ये वाद झाला. संदीप यांचा भाऊ सागर त्यावेळी घरामध्ये होता. सागरनं हा वाद थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, संगीतानं त्याला चाकूनं भोसकलं. या हल्ल्यात सागर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दरम्यान संगीतानं स्वत:च्या हाताची नस कापून घेतली. संगितावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये संगीताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
( नक्की वाचा : नाशिकच्या ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर PPE किट घालून दरोडा, 5 कोटींचे दागिने लंपास )
याच प्रकारची दुसरी घटना उरसघरमधील बांधकाम साईटवर घडली. ताहियाद अली,सुफीया अली हे दोघे पती-पत्नी मजुरी करतात. या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ताहियाद आणिसोफिया या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यांच्या शेजारी राहणारा जोहर अलीनं हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतापलेल्या ताहियादनं जोहारला लाकडी दांडक्यानं मारहाण केली.
हा लाकडी दांडका जोहारच्या डोक्याला लागल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी ताहियात विरोधात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पती-पत्नीच्या वादातून एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world