अमजद खान
भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत एका तरुणाला दोन लोक लूटत होते. त्या तरुणाने मदतीसाठी आरडा ओरडा केला. त्याचा मदतीसाठी दुसरा तरुण सरसावला. त्या तरुणाच्याही गळ्यावर चाकू ठेवून त्याला देखील लूटण्यात आले. जे लोक मदतीसाठी पुढे येत होते, त्यांना देखील चाकूचा धाक दाखवून या दोन गुंडांनी दहशत निर्माण केली होती. जवळपास हे अर्धा तास सुरू होते. हे घडत होतं डोंबिवलीत. विशेष म्हणजे तिथून हाकेच्या अंतरावरच डोंबिवली पोलिस स्टेशन होतं. अशा वेळी पोलिसांचाकाही या गुंडाना धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा गोंधळ सुरू असताना अर्ध्या तासानंतर पोलिस त्याठिकाणी पोहचले. त्या दोन्ही गुंडाना नंतर अटक केली. तेजस देवरुखकर आणि सुजित थोरात अशी या लूटारु तरुणांची नावे आहेत. या दोघांच्या विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल आहे. डोंबिवली शहरात भर रस्त्यात दोन तरुण चाकूचा धाक दाखवून लोकांना लूटत होते. या घटनेमुळे डोंबिवलीतील नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे. शिवाय शहराच्या मध्यभागीच अशा घटना घडत असल्याने भितीचे ही वातावरण निर्माण झाले आहे. यावर पोलिस काही करणार आहेत की अशीच गुंडगिरी डोंबिवलीच्या रस्त्यावर पाहायला मिळणार असा प्रश्नही आता नागरिक करत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पाकिस्तानी 'जोकर' बरळले, आफ्रिदी- भुट्टोला ओवैसींनी धुधू धुतले!
डोंबिवली पूर्वेतील टिळनगर रस्त्यावरील एसबीआय बैकेसमोर रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास एका तरुणाला दोन तरुण मारहाण करीत होते. ज्या तरुणाला मारहाण केली जात होती, तो तरुण मदतीसाठी ओरडून धावा करत होता. तिथून जाणाऱ्या राहुल चौरसिया नावाच्या एका व्यक्तीने हे पाहिले. मारहाण होत असलेल्या तरुणाच्या वेदना पाहून तो त्याच्या मदतीसाठी पुढे आला. मारहाण करणाऱ्या दोन्ही तरुणांनी मदतीसाठी आलेल्या राहुल चौरसिया याला ही मारहाण सुरु केली.
त्याच्या गळयावर चाकू ठेवत दोघांकडील रोख रक्कम हिसकावून घेतली. जे कोणी नागरीक मदतीसाठी पुढे येत होते, त्यांना दोन्ही गुंड तरुणांनी चाकूचा धाक दाखवला. शिवाय त्यांना मारहाण ही केली. कुणाला पुढे यायचं आहे त्यांनी पुढे या असं ही ते आव्हान देत होते. जिथं हे सर्व घडत होतं तिथून हाकेच्या अंतरावर असेलल्या रामनगर पोलिस ठाण्यास फोन केला गेला. पोलिस त्याठिकाणी पोहचले. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. त्यांनी लूटलेली रक्कम आणि चाकू देखील हस्तगत केला. मात्र झालेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.