
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दोन जोकर अर्थात एक शाहिद आफ्रीदी आणि दुसरा बिलावल भुट्टो हे गरळ ओकताना दिसत आहेत. शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्यावर टिका करताना तुमची काश्मीरमध्ये मोठी फौज आहे. तरीही हल्ला होतो. म्हणजे तुम्ही नालायक आहात. निकम्मे आहात. तुम्ही तुमच्या लोकांची सुरक्षा करु शकत नाही असे वक्तव्य केले होते. तर बिलावल भुट्टोने धमकीची भाषा करत रक्ताचे पाठ वाहातील असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याला एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जशाच तसे उत्तर देत या दोघांनाही धुधू धुतले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आफ्रिदी आणि भुट्टो या दोन जोकर्सनी सध्या भारतीयांच्या मनोरंजनाचा विडा उचलला आहे. एक आहे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि दुसरा आहे पाकिस्तानातल्या पीपीपी पक्षाचा बिलावल भुट्टो. पहलगाममधल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात समोर येत असताना, तो मी नव्हेचचा सूर त्यांनी लावला आहे. इतकंच नाही, तर त्याने भारती सैन्याच्या क्षमतेवर सवाल ही उपस्थित करण्याचा मूर्खपणा केला आहे. ज्याला एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी चोख उत्तरही दिलंय.
काश्मीमरमध्ये भारताचं 8 लाखांचं सैन्य काय करत होतं? भारतीय सैन्यदल नालायक आहे अशी म्हणण्याची मजल ही या आफ्रिदीची गेली होती. त्याने केलेल्या वक्तव्याबाबत ओवेसी यांनी आफ्रिदीची खिल्ली उडवली आहे. असदुद्दीन ओवैसी म्हणाले, कोण आफ्रिदी, त्या जोकरबद्दल मला विचारु नका! दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला त्यांची औकातही दाखवून दिली आहे. जेवढं भारताचं सैन्याचं बजेट आहे तेवढे संपूर्ण पाकिस्तानचं ही नाही असा टोला त्यांना आफ्रिदीला दाखवत पाकिस्तानची लायकी दाखवन दिली आहे.
ट्रेडिंग बातमी - MHADA Lottery : मुंबईत म्हाडाच्या 5000 घरांसाठी दिवाळीत लॉटरी
एकीकडे शाहीदचा असा कॉमेडी शो सुरु असताना तिकडे बिलावल भुट्टोने तीन दिवसांपासून अकलेचे तारे तोडण्याचं काम सुरुच ठेवलं आहे. ज्याने सिंधूचं पाणी अडवल्यास रक्ताचे पाट वाहण्याचा इशारा दिला होता. त्यावरून असदुद्दीन ओवैसी यांनी बिलावलला चांगलेच सुनावले आहे. तुमच्या आईचा बळी दहशतवादामुळेच गेला होता हे विसरलात का? ते दहशतवादी होते मग पहलगाममधले कोण होते? असा प्रश्न उपस्थित करत चांगलीच चपराक दिली आहे.
बिलावल काय आणि शाहीद काय. दोघांचीही बौद्धिक कुवत किती आहे हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे दहशतवादाची युनिव्हर्सिटी असलेल्या पाकिस्तानने नामानिराळे राहण्याचा प्रयत्नही केला आहे. तरी तो पुढच्या क्षणी उघडा पडतो. हे कसाबच्या कबुलीनंतर आपण पाहिलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या महाभागांनो. बरळणं बंद करा अशी सांगण्याची वेळ आता आली आहे. त्याच किती फरक या पाकड्यांना पडतो ते येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world