Dombivli News: डोंबिवली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मूळचा छत्तीसगडचा असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाने 'लिव्ह-इन पार्टनर'सोबत झालेल्या वादानंतर तिच्यासमोरच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. गुरुवारी (19 फेब्रुवारी) पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.
डोंबिवलीत नेमकी घटना काय?
ही घटना डोंबिवली (पूर्व) येथील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी (17 फेब्रुवारी) घडली. पिंटू देवा श्रीवास (वय 23 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे, तो मूळचा छत्तीसगडमधील महासमुंद येथील रहिवासी होता. 20 वर्षीय प्रेयसीसोबत तो डोंबिवलीत भाडेतत्त्वावरील घरात राहत होता.
(नक्की वाचा: Crime News: मुंबईत पोलिसांत खळबळ! PI आणि PSIला लाच घेताना अटक, ACBला केबिनमध्ये सापडलं 6.34 लाख रुपयांचं घबाड)
संशयाचे भूत आणि टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, पिंटूने दारूच्या नशेत आपल्या जोडीदारावर चारित्र्याचा संशय घेतला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या पिंटूने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्याने रागाच्या भरात काचेची बाटली फोडून स्वतःच्या छातीवर आणि मानेवर वार केले.
(नक्की वाचा: Nagpur News: हलगर्जीपणा! आईचा टाहो, वडिलांची धावपळ; 4 वर्षांचा मुलगा रात्रभर शाळेत एकटाच, नागपूरमध्ये भयंकर घडलं)
एवढ्यावरच न थांबता पिंटूने तरुणीच्या कपड्याने गळफास लावून घेतला. या घटनेनंतर त्याला तातडीने डोंबिवलीतील शास्त्रीनगर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world