
डोंबिवलीत फसवणुकीच्या आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केट'मध्ये मोठा परतावा देतो याचं आमिष दाखवून 'ग्रोथअप इंडिया' आणि 'अर्थयुक्ती कन्सल्टिंग' या कंपनीच्या नावाखाली ही फसवणूक झाली आहे. तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सर्व सामान्यांनी या कंपनीत जास्त परतावा मिळेल या विश्वासाने गुंतवणूक केली होती. पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी असे या फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. ग्रोथअप इंडिया' आणि 'अर्थयुक्ती कन्सल्टिंग' या क्लासेसच्या माध्यमातून आधी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे क्लासेस घेतले जायचे. त्यानंतर त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला जात आहोता. त्यातून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले गेले.
ट्रेंडिंग बातमी - Cyber crime: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून जेष्ठ नागरिकाला 3 कोटींचा गंडा
इतका मोठा परतावा मिळत असल्याने त्याला अनेक जण बळी पडत होते. त्यातून त्यांची फसवणूक झाल्याचे आता समोर आले आहे. सध्या या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसानी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एक फरार आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. या प्रकरणात अनेक तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात आपली तक्रार दिली आहे, अशी माहिती कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world