तरुणाच्या अंगावर गाडी घातली, फरफटत नेले! कारण ऐकून हैराण व्हाल, पाहा व्हिडीओ

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मानपाडा पोलिसांनी मिलिंद ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

कोणत्या कारणावरून कोण काय वाद काढेल याचा नेम नाही. डोंबिवलीत असाच एक प्रकार समोर आला आहे. यात एक व्यक्ती आपल्या चारचाकीने एका तरूणाला आधी उडवतो. त्यानंतर तो त्याला पुढे फरफटत नेतो. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र हे प्रकार कशा मुळे झाला याचा उलगडा झाला आहे. याबाबत पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक कारण समोरल आले आहे.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माझ्या खाजगी जागेवर उभे राहून तुम्ही काय करता? या कारणावरुन एमआर असलेल्या एका तरुणासोबत मिलिंद ठाकरे या जागा मालकाने वाद घातला. या वादानंतर मिलिंद ठाकरे याने त्याची चार चाकी गाडी संजय यादव नावाच्या तरुणाच्या अंगावर घातली. त्यानंतर त्याला दूरवर फरफटत नेले. यात संजय यादव हा जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मानपाडा पोलिसांनी मिलिंद ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - लाडक्या बहिणीची प्रतिक्षा संपणार? ऑगस्ट-सप्टेबरचे पैसे 'या' दिवशी खात्यात जमा होणार

डोंबिवली दावडी परिसरातील तुकारामनगरात संजय यादव हा तरुण राहतो. संजय हा एमआरचे काम करतो. शनिवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास दावडी येथील शिवमंदीर परिसरात रस्त्याच्या बाजूला एका जागेवर तो उभा होता. तिथे त्याचा दुसरा मित्र ही होता. त्याच्या बरोबर तो गप्पा मारत बसला होता. याच वेळी त्या ठिकाणी मिलिंद ठाकरे नावाचा व्यक्ती त्याच्या जवळ आला. ज्या जागेवर तुम्ही उभे आहात. ती  जागा  माझी खाजगी मालकीची आहे, असे सांगू लागला.  

ट्रेंडिंग बातमी - 'द लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा ट्वीट करत इशारा 

शिवाय या जागेवर उभे राहून तुम्ही का बोलत उभे आहात. या कारणावरुन मिलिंद आणि संजय यांच्यात वाद झाला. वाद वाढवू नये यासाठी संजय याने विषय तिथेच संपवून घराकडे निघाला. थोड्या वेळानंतर संजय हा घरी रस्त्याने जात असताना मिलिंद ठाकरे याने त्याच्या मालकीची कार घेऊन त्याच्या मागे आला. त्याने संजय यादवाला मागून धडक दिली. त्या संजय खाली पडला. त्यानंतर त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. या घटनेत संजय यादव याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात मिलिंद ठाकरे याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेमळे एकच खळबळ उडाली आहे.