Dombivli News: डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलचं 12 वर्षांपूर्वीचं कांड उघड, तरुणाची हत्या, बारवी धरण अन्

तब्बल 12 वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण व खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखा,घटक 03 च्या पथकाने उलगडा केला आहे. या प्रकरणामुळे रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील (55) याचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli Reel Star Surendra Patil Crime

Dombivlii Crime News: तब्बल 12 वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण व खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखा,घटक 03 च्या पथकाने उलगडा केला आहे. या प्रकरणामुळे रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील (55) याचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे. त्याच्यासह चंद्रकांत बाळाराम गायकर आणि सुरेश गोपाळ देगावत उर्फ छोटू (32) या तिघांना अटक करण्यात आली आहे. सात एकर जमीन व्यवहारातील पैशांच्या वादातून करण अरविंद बागुल (23) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट मुरबाड येथील जंगलात केल्याचे तपासात उघड झालं आहे.अशी माहिती  ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,काही दिवसांपूर्वी कुख्यात रील स्टार सुरेंद्र पाटीलच्या घरी शस्त्रांचा साठा सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. डोंबिवली पूर्वच्या दावडी येथील 23 वर्षीय तरुणाचे 2014 मध्ये अपहरण झाल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. कल्याण क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या पथकाने सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून चौकशी केली. त्याने इतर साथीदारांसह खून केल्याची कबुली दिली.

Advertisement

नक्की वाचा >> Ambarnath News: भाजप गटनेत्याने काढले नगरसेविकांचे 'ते' व्हिडीओ, अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप वाद पुन्हा पेटणार?

बारवी धरण परिसरातील जंगलात नेमकं काय घडलं?

रील स्टार पाटील आणि मयत करण बागुल याच्यासोबत जमीन विकासाच्या आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून 4 ऑक्टोबर 2014 रोजी त्याचे अपहरण करून त्याला दावडी येथील पाटील याच्या एका कार्यालयात नेण्यात आले. तेथे मुख्य आरोपी पाटील याने लोखंडी रॉडने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने मृतदेह कारमधून मुरबाड येथील बारवी धरण परिसरातील जंगलात नेऊन त्याची विल्हेवाट लावली.

नक्की वाचा >> Pune News: गुंजवणी धरणाच्या 'त्या' कामावरून शेतकरी आक्रमक,अख्खं वाल्हे गाव केलं बंद,शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

या प्रकरणात मुरबाड पोलिस ठाण्यात त्या काळात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाशी संबंधित नोंदी तपासून तोच मृतदेह असल्याची खात्री करण्यात आली.त्यानुसार मूळ अपहरणाच्या गुन्ह्यात खून व पुरावा नष्ट करण्याची कलमे जोडण्यात आली आहेत.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 2 मे 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.खूनासाठी वापरलेला लोखंडी रॉडही जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहे.