जाहिरात

Ambarnath News: भाजप गटनेत्याने काढले नगरसेविकांचे 'ते' व्हिडीओ, अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप वाद पुन्हा पेटणार?

अंबरनाथ नगरपरिषदेतील ताज्या घडामोडींनी पुन्हा एकदा स्थानिक राजकारण तापवलं आहे. अंबरनाथ येथे गेल्या काही दिवसांपासून महासभा वादाच्या भोवऱ्यात अडकली असून आता नव्या आरोपांमुळे वातावरण आणखी चिघळलं आहे.

Ambarnath News: भाजप गटनेत्याने काढले नगरसेविकांचे 'ते' व्हिडीओ, अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप वाद पुन्हा पेटणार?
Ambarnath BJP vs Shivsena News

Ambarnath Municipal Corporation News Today : अंबरनाथ नगरपरिषदेतील ताज्या घडामोडींनी पुन्हा एकदा स्थानिक राजकारण तापवलं आहे. अंबरनाथ येथे गेल्या काही दिवसांपासून महासभा वादाच्या भोवऱ्यात अडकली असून आता नव्या आरोपांमुळे वातावरण आणखी चिघळलं आहे.शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी भाजप गटनेते अभिजित करंजुले यांच्यावर महिला नगरसेविकांच्या फोटो काढण्याच्या आरोप करण्यात आला आहे. 

दोन दिवसांपूर्वी महासभेत मेगाफोन वापरण्यावरून मोठा गोंधळ झाला होता.त्यानंतर आता अभिजीत करंजुले यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला नगरसेवकांनी गंभीर आरोप केले आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार,करंजुले यांनी त्यांचे फोटो बदनामी करण्याच्या उद्देशाने काढले.या प्रकरणी कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

अभिजीत करंजुले यांनी महिलांच्या दिशेने फोटोग्राफी केली अन्..

आम्हाला महासभेत अधिकार आहे की आम्ही हात वर करून आमचा निर्णय नगराध्यक्षांना सांगू शकतो. आम्ही हात उंच करून आमचा निर्णय दर्शवला.या दरम्यान भाजप गटनेता अभिजीत करंजुले यांनी महिलांच्या दिशेने फोटोग्राफी केली. खाजगी फोटोग्राफी किंवा फोटोग्राफी गुन्हा आहे,आम्ही आधीपासूनच याला विरोध करतोय. आमची कसलीही बदनामी झाली तर आम्ही खपवून घेणार नाही.

नक्की वाचा >> Pune News: गुंजवणी धरणाच्या 'त्या' कामावरून शेतकरी आक्रमक,अख्खं वाल्हे गाव केलं बंद,शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

याबाबत शिवसेना संजय गट नगरसेविका अर्पणा भोईर यांनी म्हटलंय की,सभा तहकूब करायची की चालू द्यायची,यावर चर्चा होत असताना भाजपा गटनेता अभिजीत करंजुले यांनी आमच्या दिशेने मोबाईलवर व्हिडिओ काढला.महिलांच्या फोटो काढणे हा सभेचा अपमान आहे. महिलांच्या अपमान आहे.आम्ही अभिजीत करंजुले यांच्या निषेध करतो. मात्र,करंजुले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.त्यांच्या माहितीनुसार,आजच्या काळात महासभांमध्ये रेकॉर्डिंग होते. फोटो आणि व्हिडिओ घेणे ही सामान्य बाब आहे.

नक्की वाचा >> Jalna News: मदरशाच्या नावाखाली सर्वात भयंकर प्रकार, पोलिसांनी 13 अल्पवयीन मुलांची केली सुटका, नेमकं काय घडलं?

शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमधील तणाव वाढला 

पत्रकारदेखील असे कव्हरेज करतात.त्यामुळे हा मुद्दा अनावश्यकपणे वाढवला जात असल्याचं त्यांनी म्हटलं.त्याचबरोबर, शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा न होता अशा वादांमध्ये वेळ जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.यापूर्वीही राजेंद्र वाडेकर यांनी माइक बंद केल्याचा आरोप करत महासभेत मेगाफोन वापरला होता,ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.या सर्व घटनांमुळे शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमधील तणाव उघडपणे दिसून येत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com