Dombivli News: डोंबिवलीतील सागाव परिसरातील एका प्रसिद्ध शाळेत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेतच एका शिक्षिकेचा विनयभंग झाल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणी शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित शिक्षिकेने केलेल्या गंभीर आरोपांनुसार, आरोपी तिला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून शरीरसंबंधांसाठी दबाव टाकत होता. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
डोंबिवली सागाव परिसरातील जय भारत हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. या शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांचा मुलगा सरवना अय्यर याने शाळेतील एका शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली होती. आरोपीने केवळ मेसेजच नाही, तर अश्लील व्हिडिओ पाठवून शिक्षिकेकडे शरीरसंबंधांची मागणी केल्याचा आरोप पीडित शिक्षिकेने केला आहे. हा छळ असह्य झाल्याने शिक्षिकेने तिच्या आईसह मनसेकडे धाव घेत न्यायाची मागणी केली.
मनसेचा शाळेत राडा आणि गोंधळ
हा प्रकार समोर येताच मनसेचे पदाधिकारी राहुल कामत, अरुण जांभळे आणि महिला पदाधिकारी कोमल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह थेट शाळेत धाव घेतली. यावेळी शाळेत ट्रस्टी शिवा अय्यर आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. मनसे कार्यकर्त्यांनी आरोपी मुलाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत शाळेत जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे 1 तास शाळेत तणावाचे वातावरण होते. आरोपीला मनसे स्टाईलने धडा शिकवू, असा पवित्रा घेतल्याने गोंधळ अधिकच वाढला होता.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या हाय प्रोफाईल सोसायटीतील भयंकर भांडण, शेजारच्या अंगावर सोडला कुत्रा, 3 दिवस... )
घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मनसे पदाधिकाऱ्यांना शांत केले. त्यानंतर पोलिसांनी ट्रस्टी शिवा अय्यर यांच्याकडे त्यांच्या मुलाबाबत विचारणा केली. शिवा अय्यर यांनी पोलिसांना सहकार्य करत आपल्या मुलाला घराबाहेर काढले. पोलिसांनी आरोपी सरवना अय्यर याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले.
( नक्की वाचा : CIDCO Lottery: मर्सिडीजमधून येणाऱ्याला गरिबांचे घर? सिडकोच्या अजब नियमावर हायकोर्टाचा चाबूक! 26 हजार घरं... )
ट्रस्टी वडिलांनी काय सांगितलं?
मुलावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, माझ्या मुलावर जो काही गंभीर आरोप करण्यात आला आहे, त्या प्रकरणात तो जर दोषी आढळला तर त्याला कायद्यानुसार कडक शिक्षा झालीच पाहिजे. सध्या मानपाडा पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून, पीडित शिक्षिकेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world