Dowry Case News: एका निवृत्त डीवायएसपीच्या मुलीने पती डॉ. गोवर्धन आणि सासरा प्रोफेसर नगराजूविरोधात हुंड्यासाठी छळ, अश्लील भाषा वापरणे आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेचे 2 नोव्हेंबर 2023 रोजी डॉ. गोवर्धनसोबत लग्न झाले होते. तिच्या वडिलांनी लग्नासाठी सोने, चांदी, अन्य गोष्टी मिळून अंदाजे 25 लाख रुपये खर्च केला होता. इतकं केल्यानंतर लग्नाच्या अवघ्या 15 दिवसांनंतरच पतीने माहेरची संपत्ती आणि भाड्याच्या उत्पन्नातील वाटा मागण्यास सुरुवात केली. वडिलांकडून पैसा आणण्यासाठी गोवर्धन पत्नीवर दबाव टाकत होता, कारण नोकरी सोडून त्याला नर्सिंग होम उभारायचं होतं. सर्वात गंभीर आरोप तर सासऱ्याविरोधात करण्यात आले आहेत. FIRनुसार प्रोफेसर नगराजूने अश्लील भाषा वापरत लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडितने केलाय. हा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील नेलमंगला येथील आहे.
सासऱ्याची अश्लील भाषा
पीडित महिलेने तक्रारीमध्ये अश्लील भाषा वापरुन लैंगिक छळ केल्याचा आरोप केलाय. लग्न होऊन इतके महिने झाले तरी काही गोड बातमी का नाही? माझा मुलगा तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवतोय की नाही? नाही तर मीच येतो, अशा वाईट पद्धतीने वारंवार छळ केल्याचंही पीडितेचं म्हणणंय तसंच मॉडर्न मुलीप्रमाणे अर्धे कपडे घालून माझ्यासमोर ये, असेही सासऱ्याने म्हटल्याचं आरोप तिने केलाय.
(नक्की वाचा: Shocking News: ... म्हणून नवऱ्यानं बायकोला जुगारात डावावर लावले, 8 जणांकडून सामूहिक बलात्कार, सासराही सहभागी)
"घरातली गोष्ट आहे, जुळवून घे"
पीडितने महिलेस यास विरोध केला तेव्हा पती आणि सासऱ्याने तिला म्हटलं की घरातली गोष्ट आहे,जुळवून घे.
(नक्की वाचा: Nashik News: मदतीचा बहाना मग धमकावलं; भोंदूबाबाचा महिलेवर 14 वर्ष लैंगिक अत्याचार, लाखो रुपयेही लुटले)
पीडितेने नोंदवली तक्रारवाढत्या मानसिक, आर्थिक आणि लैंगिक छळाला कंटाळून पीडितेने नेलमंगला पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तिच्या पती, सासरे आणि सासूविरोधात हुंड्यासाठी छळ करण्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास सुरू आहे.