जाहिरात

Shocking News: ... म्हणून नवऱ्यानं बायकोला जुगारात डावावर लावले, 8 जणांकडून सामूहिक बलात्कार, सासराही सहभागी

Shocking News : सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहितेने तिच्या नवऱ्यासह सासरच्या लोकांवर केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली आहे.

Shocking News:  ... म्हणून नवऱ्यानं बायकोला जुगारात डावावर लावले, 8 जणांकडून सामूहिक बलात्कार, सासराही सहभागी
Shocking News : विवाहित महिलेवर झालेला अत्याचार समजल्यानंतर तुम्हाला झोप येणार नाही. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Shocking News : सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहितेने तिच्या नवऱ्यासह सासरच्या लोकांवर केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. हुंड्याची हाव, जुगाराचं व्यसन आणि वासनेच्या आंधळ्या शर्यतीत या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असून, ती मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचली होती. उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यातून समोर आलेल्या या अत्यंत हृदयद्रावक घटनेत माणुसकीला काळिमा फासला गेला आहे. पीडितेने जुगारामध्ये डावावर लावल्यानंतर आठ लोकांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार (गँगरेप) केल्याचा, तसेच जबरदस्ती गर्भपात आणि ॲसिड हल्ल्याचा आरोप केला आहे. हा गुन्हा बिनोली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातल्या निवाडा गावची रहिवासी आहे. तिचं लग्न 24 ऑक्टोबर 2024 रोजी मेरठच्या खिवाई गावच्या दानिश नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. मात्र, लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांतच तिला कळलं की तिचा पती दारू आणि जुगार खेळण्याच्या व्यसनात बुडालेला आहे. हुंडा कमी आणल्याच्या कारणावरून सासरचे लोक तिला सतत त्रास देत असत.

( नक्की वाचा : Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट )
 

जुगारामध्ये पत्नीला लावले 'डावावर'

पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिचा पती दानिश याने जुगारात हरल्यानंतर तिला चक्क जुगाराच्या डावावर लावलं. पती हरल्यानंतर, 8 लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार (गँगरेप) केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. यातील उमेश गुप्ता, मोनू आणि अंशुल या 3 जणांना तिने ओळखले आहे. हे तिघेही गाझियाबादचे रहिवासी आहेत.

नणंदेचा नवरा आणि सासऱ्यावरही आरोप

पीडितेच्या दुःखाचा अंत इथेच झाला नाही. जुगाराच्या घटनेनंतर तिचा दीर (जेठ) शाहिद आणि नणंदेचा नवरा (ननदोई) शौकीन यांनीही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. सर्वात मोठा आणि गंभीर आरोप तिने आपला सासरा यामीन याच्यावर लावला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचा सासरा तिला वारंवार हुंड्याबद्दल टोमणे देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत असे. 'दहेज नाही आणलास, तर आमचं प्रत्येक म्हणणं ऐकावं लागेल आणि आम्हाला खूश करावं लागेल,' असं सासरचे लोक तिला धमकावत असत.

( नक्की वाचा : Amravati News : अमरावतीत किन्नर महामंडलेश्वरांच्या बळजबरी धर्मांतराचा गंभीर प्रकार! पोलिसांवर गंभीर आरोप )
 

जबरदस्ती गर्भपात, ॲसिड हल्ला आणि नदीत फेकण्याचा प्रयत्न


सासरच्यांनी तिच्यावर अनेक अत्याचार केल्याचा दावा पीडितेने केला आहे. ती गर्भवती असताना, कुटुंबाने जबरदस्तीने तिचा गर्भपात करवला. तसेच, तिला मारण्याच्या हेतूने तिच्या पायांवर ॲसिड टाकण्यात आले आणि तिला नदीत ढकलून देण्यात आले, असा आरोपही तिने केला आहे.

पीडिता कशीबशी स्वतःला वाचवून माहेरी पोहोचली. तिच्या कुटुंबीयांनी तिला मदत केली. मात्र, आरोपी पक्ष तिचे वडील आणि कुटुंबावर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचे पीडितेने सांगितले आहे. न्याय मिळवण्यासाठी ही तरुणी पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयात पोहोचली आहे. बागपत पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, या प्रकरणात बिनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे आणि कठोर कारवाई केली जाईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com