वैभव घुगे, नाशिक
Nashik News: अंधश्रद्धेचा फायदा घेऊन एका महिलेचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमधील इंदिरा नगर परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणेश जगताप नावाच्या भोंदूबाबावर हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील 14 वर्षांपासून हा भोंदूबाबा पीडित महिलेवर ब्लॅकमेल करत अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे.
दारुड्या नवऱ्याचे व्यसन सोडवण्यासाठी मदत करतो, अशी दिशाभूल करत आरोपी गणेश जगतापने बळजबरीने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. गणेश जगताप आणि पीडितेचा पती हे एका मंडप डेकोरेटर्सकडे नोकरी करत होते. त्या ठिकाणी जगताप हा व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. त्यामुळे पीडितेच्या घरी त्याचे येणे जाणे होते.
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा गणेश जगताप हा महिलेवर जबरदस्त मानसिक दबाव आणत होता. "तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो, अशी भीती दाखवत आरोपी महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत होता. या भोंदूबाबाकडे सापडलेल्या पुस्तकात महिलेच्या नवऱ्याचे आणि मुलांची नावे लिहिलेली आढळली. तू माझ्यासोबत शरीरसंबंध नाही ठेवलेस, तर एकाचा बळी जाईल, अशी भीती देखील तो पीडितेला दाखवत होता. ही भीती दाखवून 2010 पासून आतापर्यंत अनेकदा भोंदूबाबाने महिलेवर शारीरिक अत्याचार केले.
(नक्की वाचा- Malegaon Crime: वडिलांशी भांडण... चिमुकल्या लेकीला ओरबाडलं, अत्याचारानंतर दगडाने ठेचलं)
50 लाखांची आर्थिक फसवणूक
भोंदूबाबाने काहीतरी पावडरचे चाटण खाण्यास दिले आणि अत्याचार केल्याचं फिर्यादी महिलेकडून सांगण्यात आलं आहे. तसेच 50 लाखाची आर्थिक फसवणूक देखील केली.
याआधीही अनेक गुन्ह्यांची नोंद
याआधीही सोने फसवणूक प्रकरणात 2020 मध्ये भोंदू बाबाला अटक झाली होती. यापूर्वीही त्यावर असे अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याला अटक झाली होती. आता चार वर्षानंतर पुन्हा एकदा या भोंदूबाबाचा प्रताप उघडकीस आला आहे. हा भोंदू बाबा अद्यापही फरार असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाणे अंतर्गत सुरू आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून गणेश जगताप हा भोंदूबाबा फरार असून, इंदिरानगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने देखील आरोपीला अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world