जाहिरात

Pune News : चिंता वाढली, परिसरात नाकेबंदी; पुण्यातील गर्ल्स हॉस्टेलबाहेरील 'त्या' बंद बॉक्सचं गूढ अखेर उलगडलं

पुण्यात मुलींच्या वसतिगृहाबाहेर त्या बॉक्समुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. अज्ञात व्यक्तीने तो बॉक्स मुलींच्या वसतिगृहाबाहेर ठेवण्याच सुरक्षा रक्षकाकडून सांगण्यात आलं होतं.

Pune News : चिंता वाढली, परिसरात नाकेबंदी; पुण्यातील गर्ल्स हॉस्टेलबाहेरील 'त्या' बंद बॉक्सचं गूढ अखेर उलगडलं
AI Image

Pune News : पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगरमधील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या राजे राजेश्वरी गर्ल्स हॉस्टेलच्या गेटवर सकाळी सव्वा आठच्या सुमारास एक मोठा गिफ्ट बॉक्स आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. 

बेवारस बॉक्समुळे खळबळ

नुकत्याच पुण्यात घडलेल्या बॉम्बच्या अफवा आणि घटनांच्या पार्श्वभूमीवर या बॉक्समुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हॉस्टेलच्या मुख्य गेटवर कोणीतरी अज्ञात व्यक्ती हा मोठा बॉक्स ठेवून गेली होती. सुरक्षा रक्षकाला या बेवारस बॉक्सचा संशय आल्याने त्याने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसराची नाकेबंदी केली आणि अत्यंत काळजीपूर्वक त्या संशयास्पद बॉक्सची तपासणी केली. जेव्हा पोलिसांनी तो बॉक्स उघडला, तेव्हा त्यात एक मोठा टेडी बियर असल्याचं समोर आलं. बॉक्समध्ये कोणतीही धोकादायक किंवा संशयास्पद वस्तू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. हा बॉक्स हॉस्टेलमधीलच एका विद्यार्थिनीसाठी पाठवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नक्की वाचा - Pune News : पुण्याच चाललंय काय? बिश्नोई गँगचा नामांकित मॉलवर गोळीबार, सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी  

'तो' टेडीबियर कुणासाठी? 

अखेर अज्ञात व्यक्तीने ठेवलेल्या त्या बॉक्समध्ये टेडिबियर असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दरम्यान हा टेडिबिअर वसतिगृहातील विद्यार्थिनीसाठी ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप तो टेडिबियर कुणी आणि कुणासाठी ठेवला होता याबाबत कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com