पुण्यात बँक खाते भाड्यानं घेऊन सुशिक्षितांची फसवणूक, 8 महिन्यांमध्ये 278 कोटी लुबाडले

Pune scam : पुणे शहरात अशिक्षित लोकांची बँक खाती भाड्यानं घेऊन शहरातील सुरक्षिक्षत लोकांना फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. गेल्या 8 महिन्यात यामध्ये तब्बल 278 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

राज्याच्या सांस्कृतिक राजधानी, विद्यार्थ्यांचं आवडतं शहर, शिक्षणाचं केंद्र, आयटी सिटी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातली धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुणे शहरात अशिक्षित लोकांची बँक खाती भाड्यानं घेऊन शहरातील सुरक्षिक्षत लोकांना फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. गेल्या 8 महिन्यात यामध्ये तब्बल 278 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर क्राईम विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सुशिक्षितांची फसवणूक

'या प्रकरणात फसवणूक झालेल्यांमध्ये अर्ध्याहून अधिक हे आयटी क्षेत्रात काम करणारे, नेव्ही, आर्मीमधील अधिकारी, सरकारी अधिकारी, डॉक्टर्स यासारख्या सुशिक्षित लोकांचा समावेश आहे. 1 हजार टक्के परतावा मिळेल या लोभानं अनेकांनी कोट्यावधी रुपये यामध्ये गुंतवले. काही जणांनी बँकांकडून कर्ज काढलं, त्यांचीही फसवणूक झाली. या प्रकरणात किमान दोन ते अडीच लाख ते जास्तीत जास्त 2 कोटींपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक झालेल्या वैयक्तिक केस आहेत. एकूण 1003 जणांची 218 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झालीय' अशी माहिती शिंदे यांनी दिली. 

या प्रकरणात गेल्या आठ महिन्यात फक्त आठ आरोपींना अटक झाली आहे. एकूण 218 कोटींपैकी 1 कोटी 26 लाख रुपये लोकांना परत मिळाले आहेत. ही फक्त पुणे शहरातील आकडेवारी आहे.  पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यात मिळून सुमारे पाचशे कोटी रुपयाला सायबर भामट्याने आठ महिन्यांत लोकांना फसवलं आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : Exclusive : पुण्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड, उच्चशिक्षित तरुण ग्राहक, कुरिअरनं सुरु होता व्यापार! )
 

काय आहे पॅटर्न?

या प्रकरणात अकाऊंट भाड्यानं घेण्याचे 3 प्रकार आहेत, असं शिंदे यांनी सांगितलं. पहिल्या प्रकरातील लोकांना 3 ते 5 टक्के व्याज देऊ असं आमिष दाखवून त्यांचं खातं या कामासाठी वापरलं जातं. दुसऱ्या प्रकारातील लोकांना आपलं खातं भाड्यानं वापरलं जात आहे, याची कल्पनाच नसते. तर तिसऱ्या प्रकारात बनावट अकाऊंट तयार करुन ती वापरली जातात. 

( नक्की वाचा : पुण्यात चाललंय काय ! सांस्कृतिक राजधानीला पडलाय ड्रग्जचा विळखा )
 

अनेकदा या प्रकरणात मुळ अकाऊंट होल्डरचा पत्ता अनेकदा परराज्यातील असतो. त्या ठिकाणी त्याच्या शोधासाठी टीम पाठवली तरी त्या तपासात अनेकदा यश मिळण्याचं प्रमाण कमी आणि संथ असतं, असंही शिंदे यावेळी म्हणाले. 

Advertisement
Topics mentioned in this article