जाहिरात

Exclusive : पुण्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड, उच्चशिक्षित तरुण ग्राहक, कुरिअरनं सुरु होता व्यापार!

Pune Drugs Racket :  पुणे पोलिसांनी शहरातील ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड केलं आहे. NDTV मराठीला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार अंमली पदार्थची चटक लागलेले 131 संशयित पुणेकर पोलिसांनी शोधले आहेत

Exclusive : पुण्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड, उच्चशिक्षित तरुण ग्राहक, कुरिअरनं सुरु होता व्यापार!
पुणे पोलिसांनी ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड केलं आहे. (प्रातिनिधिक फोटो)
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Pune Drugs Racket :  पुणे पोलिसांनी शहरातील ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड केलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी, गुन्हे शाखेने लोहेगाव, विश्रांतवाडी येथील एका फ्लॅटवर छापा टाकून 1 कोटी रुपये किमतीचे 471 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. या प्रकरणात अधिक तपास केल्यानंतर या प्रकरणातील बड्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

NDTV मराठीला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार अंमली पदार्थची चटक लागलेले 131 संशयित पुणेकर पोलिसांनी शोधले आहेत. समाजातील सर्व स्तरातील तरुण आणि तरुणींचा यामध्ये समावेश आहे. यामधील 70 जणांनी पोलिसांनी नोटीस बजावली असून त्यांच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे. 

सुशिक्षित तरुण कुरिअरद्वारे मेफेड्रोन (MD) हे ड्रग्ज मागवत असत. या सर्व रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.  दोन आठवड्यांपूर्वी, गुन्हे शाखेने लोहेगाव, विश्रांतवाडी येथील एका फ्लॅटवर छापा टाकून 1 कोटी रुपये किमतीचे 471 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते.  या कारवाईत श्रीनिवास संतोष गोडजे, रोहित बेंडे आणि निमिष आबनावे यांना अटक करण्यात आली होती. अंंमली पदार्थाच्या व्यापारात या सर्वांचा सहभाग होता. 

( नक्की वाचा : पुण्यात चाललंय काय ! सांस्कृतिक राजधानीला पडलाय ड्रग्जचा विळखा )

या प्रकरणात अधिक तपास केल्यानंतर शेकडो तरुणांनी कुरिअर सेवेद्वारे औषध खरेदी केल्याचे पोलिसांना आढळून आलं. यामधील  बहुतांश व्यक्ती उच्चशिक्षित आणि कांही आयटी कंपन्यांमध्ये नोकरीमध्ये आहेत. पोलिसांनी या संशयितांची ओळख पटवली असून त्यांना शोधण्यासाठी सात पथके तैनात केली आहेत, अशी माहिती  डीसीपी गु्न्हे शाखेच्या निखील पिंगळे यांनी दिली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
'मी तिला मारले नसते तर..' गर्लफ्रेंडचे 59 तुकडे करुन फ्रिज ठेवणाऱ्या मृत आरोपीच्या नोटमधून ट्विस्ट
Exclusive : पुण्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड, उच्चशिक्षित तरुण ग्राहक, कुरिअरनं सुरु होता व्यापार!
palghar double murder police cracked mystry of  dead body of a 28year-old woman tied to a large boulder
Next Article
दगडांना बांधलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, 2 वर्षांच्या मुलीलाही सोडले नाही; दुहेरी हत्याकांडामुळे पालघर हादरले