GST घोटाळाप्रकरणी ईडीची छापेमारी, लहानसहान कंपन्यांद्वारे घोटाळा केल्याचा पत्रकारावर आरोप

सेवा किंवा वस्तूंचा पुरवठा न करता बोगस बिले तयार करून त्याद्वारे घोटाळा केल्याचा तपास यंत्रणांना संशय होता. यामुळेच ही छापेमारी करण्यात आली आहे.   

जाहिरात
Read Time: 3 mins
अहमदाबाद:

गुजरातमध्ये उघडकीस आलेल्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी ईडीने छापेमारी केली आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (GST Scam) घोटाळ्याप्रकरणी गुजरातमधील एका पत्रकाराला मंगळवारी अटक करण्यात आली. अहमदाबाद गुन्हे शाखेने एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराला अटक केली होती. तब्बल 220 लहान सहान कंपन्यांच्या आडून एका शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यामध्ये पत्रकाराचाही समावेश असल्याचा आरोप आहे. हा आरोप गुजरातमधील एका पत्रकारावर असून, त्याने सरकारला चुना लावल्याचे उघडकीस येत चालले आहे. सुरुवातीला गुजरात पोलिसांनी या घोटाळ्याचा तपास सुरू केला होता आणि त्यांनी पत्रकाराच्या घरातून 20 लाख रुपये , सोन्याचे दागिने आणि जमिनीची कागदपत्रे जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता ईडीदेखील पुढे आली असून ईडीने याच प्रकरणी छापेमारी केली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ईडीच्या अहमदाबादस्थित विभागीय कार्यालयाने सात ठिकाणी छापेमारी केली. ध्रुवी एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीने लहानसहान कंपन्यांच्या माध्यमातून केलेल्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. ईडीने याच प्रकरणाचा तपास करत असताना यापूर्वी 23 ठिकाणी छापेमारी केली होती. हे एक मोठं षडयंत्र असल्याचं ईडीचे म्हणणे आहे. याचे मूळ खोदून काढण्यासाठी ही छापेमारी करण्यात येत आहे. या तपासामध्ये सीबीआयदेखील सामील होण्याची शक्यता असून यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य किती आहे हे यावरून समजणे सोपे होईल. 

Advertisement

नक्की वाचा : मुंबई टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियाचा नवा डाव, IPL विजेता बॉलर करणार पदार्पण?

7 ऑक्टोबर रोजी एहमदाबाद गुन्हे शाखेने जीएसटी गुप्तचर विभागाच्या महासंचालकांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता.  पोलिसांनी सुरुवातीला ध्रुवी एंटरप्रायझेससह 13 संस्थांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये पत्रकाराच्या चुलत भावाच्या कंपनीचाही समावेश होता. गैरमार्गांचा अवलंब करून जीएसटी भरणे टाळल्याचे प्रकार उघडकीस आले असून यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा संशय आहे. बनावट कागदपत्रे आणि ओळखीचा वापर करून करचुकवेगिरी केली जात असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.  सेवा किंवा वस्तूंचा पुरवठा न करता बोगस बिले तयार करून त्याद्वारे घोटाळा केल्याचा तपास यंत्रणांना संशय होता. यामुळेच ही छापेमारी करण्यात आली आहे.   

Advertisement

पत्रकाराकडून ताब्यात घेण्यात आलेल्या कागदपत्रांचा वापर त्याने कामासाठी केला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी या पत्रकाराविरोधात 28 लाखांच्या फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला आहे.   प्रणव शाह नावाच्या एका उद्योजकाने पत्रकाराला जाहिरातीसाठी 23 लाख रुपये दिले होते आणि आलिशान पार्टी आयोजित करण्यासाठी 5 लाख रुपये दिले होते. महेश लांगा नावाच्या या पत्रकाराने पैसे घेतले मात्र काम न केल्याने त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाह यांनी लांगाला दिलेल्या पैशांचा माग लागला आहे कारण यातील काही रक्कम ही ऑनलाईन पाठवण्यात आली होती. लांगा याच्यावर गांधीनगरमध्ये मेरीटाईम बोर्डाची काही कागदपत्रे मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कागदपत्रे सार्वजनिक नसून ती गोपनीय होती. 

Advertisement
Topics mentioned in this article